Advertisement

म्हाडामध्ये मेगाभरती, भरणार 'इतक्या' जागा

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया रखडली होती. आता राज्यात सरकार स्थापन झाल्यामुळे भरती प्रक्रियेला वेग आला आहे.

म्हाडामध्ये मेगाभरती, भरणार 'इतक्या' जागा
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळात आता मेगाभरती होणार आहे. म्हाडाने कर्मचारी भरती करण्याची घोषणा केली आहे. या भरतीत ५३४ जागा भरण्यात येणार आहेत. त्यामळे बेरोजगारांना म्हाडामध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. 

म्हाडामध्ये गृहनिर्माण प्रकल्प, लॉटरी पात्रता पडताळणी, पुनर्विकास योजना, संक्रमण शिबिरांशी संबंधित कामे, इत्यादीसाठी कर्मचाऱ्यांची मोठी आवश्यकता असते. त्यामुळे म्हाडाने आपलं मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया रखडली होती. आता राज्यात सरकार स्थापन झाल्यामुळे भरती प्रक्रियेला वेग आला आहे. गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या बैठकीत भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

म्हाडाच्या विविध मंडळांमध्ये सुमारे ७०६ जागा रिक्त आहेत. म्हाडाच्या मुंबई आणि कोकण विभागामार्फत काढण्यात आलेल्या लॉटरीधारकांना अद्याप घराचा ताबा मिळाला नाही. कर्मचाऱ्यांच्या कमरतेमुळे अनेक कामं खोळंबत आहेत. त्यामुळे लवकर जागा भरल्या जाणार आहेत. रिक्त जागांपैकी ५३४ जागांसाठी लवकरच जाहीरात काढण्यात येणार आहे. 



हेही वाचा -

मोनोच्या २ गाड्यांमध्ये २५ मिनिटांचं अंतर, प्रवाशांची गैरसोय

नवीन बीकेसी योजना एमएमआरडीएने गुंडाळली




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा