Advertisement

मोनोच्या २ गाड्यांमध्ये २५ मिनिटांचं अंतर, प्रवाशांची गैरसोय

मोनो गाड्यांच्या अपुऱ्या संख्येमुळं या मार्गावर ३ गाड्यांची सेवा सुरू आहे.

मोनोच्या २ गाड्यांमध्ये २५ मिनिटांचं अंतर, प्रवाशांची गैरसोय
SHARES

मुंबईतील वडाळा ते सातरस्ता मार्गावर सुरू झालेल्या मोनो रेलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. परंतु, आता प्रवाशांची प्रवासादरम्यान गैरसोय होत आहे. या मार्गावरून ५ मोनो धावत असल्याचा दावा 'एमएमआरडीए'कडून केला जात असला तरी, प्रत्यक्षात मात्र तीनच मोनो धावत असल्याची माहिती मिळते. त्यामुळं एकूण ६ ते ७ गाड्या वापरात नसल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

३ गाड्यांची सेवा

मोनो गाड्यांच्या अपुऱ्या संख्येमुळं या मार्गावर ३ गाड्यांची सेवा सुरू आहे. गाड्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे २ गाड्यांमध्ये २५ मिनिटांचं अंतर ठेवावं लागत आहे. एक गाडी सुस्थितीत आहे, पण ती राखीव ठेवण्यात आली आहे. सेवेत असलेली एखादी गाडी नादुरुस्त झाली, तर तात्काळ दुसरी गाडी हाताशी हवी, या हेतूने एक गाडी यार्डात ठेवण्यात आली आहे.

६ गाड्या बंद

मोनोच्या ताफ्यात ११ गाड्या आवश्यक आहेत. सध्या ६ गाड्या बंद आहेत. एक गाडी मलेशियाहून आलीच नाही. ज्या गाड्या आहेत, त्यांची सुटे भाग वापरून बांधणी करणं आवश्यक होतं. परंतु, सुट्या भागांचा अभाव असल्यानं बांधणी करणं शक्य झालेलं नाही. २ ते ३ गाड्या जवळपास भंगारातच जाण्याच्या स्थितीत आहेत. नव्या गाड्यांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या गाड्या ताफ्यात येण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे. तोपर्यंत प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.



हेही वाचा -

आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये यंदा अभिनेता रोबो

रेल्वे पुलांच्या बांधकाम प्रकल्पखर्चात होणार वाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा