Advertisement

रेल्वे पुलांच्या बांधकाम प्रकल्पखर्चात होणार वाढ

मुंबईसह उपनगरातील रेल्वे हद्दीतल्या धोकादायक पुलांच्या दुरूस्तीचं काम महापालिकेनं हाती घेतलं आहे.

रेल्वे पुलांच्या बांधकाम प्रकल्पखर्चात होणार वाढ
SHARES

मुंबईसह उपनगरातील रेल्वे हद्दीतल्या धोकादायक पुलांच्या दुरूस्तीचं काम महापालिकेनं हाती घेतलं आहे. या पुलांच्या कामसाठी लागणारा खर्च निश्चित करण्यात आला आहे. मात्र, आता या खर्चात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वेच्या हद्दीतील पुलांच्या देखभाल खर्चाची भर पडल्यानं पालिकेचा पुलांचा प्रकल्पखर्च १९.२५ टक्क्यांनी वाढणार असल्याचं समजतं. हा प्रकल्पखर्च रेल्वेमुळं वाढणार असल्याचं प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

११ पुलांची कामं

मुंबईतील रेल्वे मार्गावर सध्या ११ पुलांची कामं हाती घेण्यात आली आहेत. या पुलांच्या कामांसाठी पालिकेतर्फे 'महाराष्ट्र रेल इन्फ्रास्टक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन' या तज्ज्ञ संस्थेची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या सल्लागार सेवेसाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या ११ टक्के व्यवस्थापन शुल्क देण्यात येणार आहे. मात्र, आता महापालिकेला या शुल्कासोबतच सव्वाआठ टक्के देखभाल शुल्कदेखील द्यावे लागणार आहेत.

पुलांचं बांधकाम

मध्य व पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी रेल्वे मार्गावरील पुलांचं बांधकामासाठी 'महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड' या तज्ज्ञ संस्थेकडून मदत घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार सदर संस्थेची मुंबईतील रेल्वेवरील पुलांच्या कामांसाठी सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागातील ६८ पुलांची कामं त्यांच्या देखरेखीखाली होत आहे. त्याशिवाय, मुंबईतील अनेक रेल्वे पूल व एक भुयारी वाहतूक मार्गाचं कामदेखील याच संस्थेच्या देखरेखीखाली होणार आहे.


अर्थसंकल्पीय तरतुदी

या सर्व पुलांच्या कामांचा प्रकल्प खर्च हा महापालिकेच्या पूल विभागाच्या कॉस्ट सांकेतकानुसार भांडवली अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवण्यात येणार आहे. कामांसाठी या संस्थेनं प्रकल्प खर्चाच्या ११ टक्के एवढे व्यवस्थापन शुल्क व रेल्वे प्रशासनाला रेल्वे हद्दीतील पुलांच्या कामांच्या प्रकल्प खर्चाच्या ८.२५ टक्के देखभाल शुल्क अशा पद्धतीने एकूण शुल्क आकारले जाणार असल्याचं कळविण्यात आलं आहे.


पूल प्रकल्प

  • भायखळा रेल्वे लाइन पूल
  • ओलिवंट रेल्वे लाइन पूल
  • आर्थर रोड रेल्वे लाइन पूल
  • गार्डन अर्थात एस ब्रिज रेल्वे लाइन पूल
  • रे रोड रेल्वे लाइनवरील पूल
  • करी रोड रेल्वे लाइनवरील पूल
  • बेलॉसिस रेल्वे लाइनवरील पूल
  • महालक्ष्मी स्टील रेल्वे लाइनवरील पूल
  • टिळक रेल्वे लाइनवरील पूल
  • डी.पी. रोडवरील मध्य रेल्वे ओलांडून जाणारा पूल



हेही वाचा -

पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईत विद्यार्थ्यांचं आंदोलन

फडणवीसांनी घाेटाळेबाजांना क्लीन चीट द्यायचंच काम केलं, सचिन सावंत यांचा आरोप



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा