Advertisement

जामिया हिंसाचार: कलिना कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन

जामिया मिलिया इस्लामिया (जेएमआय) आणि अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी (एएमयू) इथं पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शेकडो विद्यार्थी, कार्यकर्ते आणि नागरिक मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस परिसरात जमले होते.

जामिया हिंसाचार: कलिना कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन
SHARES

नागरिकता दुरुस्ती कायदाच्या विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात (जेएमआय) हिंसाचाराच्या घटना घडल्या. याप्रकरणी जामिया मिलिया इस्लामिया (जेएमआय) आणि अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी (एएमयू) इथं पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शेकडो विद्यार्थी, कार्यकर्ते आणि नागरिक मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस परिसरात जमले होते. तसंच, आयआयटी मुंबई आणि टाटा सामाजिक संस्थेतील विद्यार्थ्यांनीही आंदोलन केलं. या विद्यार्थ्यांनी सोमवारी आंदोलन केलं असून, हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हिंसाचार केल्याचा आरोप

लोकशाही मार्गानं व शांतपणे आंदोलन करत राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि सुधारित नागरिकत्व कायद्याचा (सीएए) विरोध करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांविरूद्ध पोलिसांनी हिंसाचार केल्याचा आरोप विद्यार्थी करत होते. या सर्व घडामोडींची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी व्हावी व पोलिस कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली.

ठिकठिकाणी निषेध

पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराचा देशभरात ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. आंदोलन केली जात आहेत. तसंच, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले असता या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यामुळं पोलिसांनी विद्यार्थ्यांची धरपकड केली. या संपुर्ण घटनेत ४ बससह अनेक वाहनं जाळण्यात आल्याचं समजतं.हेही वाचा -

जे. जे. रुग्णालयाच्या 'या' विभागांमध्ये अद्ययावत श्रवणयंत्र विभाग

आरेप्रकरणी सुप्रीम कोर्टात जानेवारीमध्ये सुनावणीसंबंधित विषय
Advertisement