Advertisement

आरेप्रकरणी सुप्रीम कोर्टात जानेवारीमध्ये सुनावणी

आरे कॉलनीतील वृक्षतोडीविरोधात दाखल याचिकांवरील सुनावणी सुप्रीम कोर्टानं पुढं ढकलली आहे.

आरेप्रकरणी सुप्रीम कोर्टात जानेवारीमध्ये सुनावणी
SHARES

आरे कॉलनीतील वृक्षतोडीविरोधात दाखल याचिकांवरील सुनावणी सुप्रीम कोर्टानं  पुढं ढकलली आहे. ही सुनावणी जानेवारीमध्ये होणार आहे. महाराष्ट्रातील नवीन सरकार मेट्रो कारशेडसाठी दुसऱ्या पर्यायी जागेचा शोध घेत आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं ही सुनावणी पुढे ढकलली.
 

आरे कॉलनीत मेट्रो कारशेड उभारण्यात येणार आहे. यासाठी आरे कॉलनीतील हजारो झाडे तोडण्यात आली. याविरोधात परिसरातील नागरिक आणि वृक्षप्रेमींनी आंदोलनही केलं. हे वृक्षतोडीचं प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या विशेष खंडपीठानं ७ ऑक्टोबरला आरेतील वृक्षतोडीला तूर्तास स्थगिती दिली होती. आतापर्यंत किती झाडं तोडली त्याचा तपशील देण्यात यावा, असे निर्देश कोर्टानं दिले होते. 

आरेतील वृक्षतोडीवर २१ ऑक्टोबरलाही सुनावणी झाली होती. त्यावेळी कोर्टाने वृक्षतोडीवरील मनाई आदेश १५ नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवला होता. आरे कॉलनीत सध्या वृक्षतोड होत नसल्याचं निवेदन महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सुनावणीवेळी केले. त्यानंतर न्यायमूर्ती अरुण मिश्रा व न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने सर्व याचिकांवरील पुढील सुनावणी होईपर्यंत आधीचा आदेश कायम ठेवला होता.



हेही वाचा -

आरेमधील मेट्रो कारशेडसह प्रस्तावित प्रकल्पांनाही पर्यावरणवाद्यांचा विरोध कायम




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा