Advertisement

आरेमधील मेट्रो कारशेडसह प्रस्तावित प्रकल्पांनाही पर्यावरणवाद्यांचा विरोध कायम


आरेमधील मेट्रो कारशेडसह प्रस्तावित प्रकल्पांनाही पर्यावरणवाद्यांचा विरोध कायम
SHARES

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३च्या प्रकल्पासाठी आरे कॉलनीमध्ये कारशेड उभारणयात येणार आहे. या कारशेडसाठी आरे कॉलनीमधील २०००हून अधिक झाडं कापण्यात आली. या वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आहे. तसंच, आंदोलनही केलं, त्यानंतर या कामावर बंदी आणण्यात आली. मात्र, तरीही आरे कॉलनीमध्ये मेट्रो भवनाचं काम सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकल्पासह आरेमध्ये भविष्यात विविध प्रकल्प प्रस्तावित आहेत. आरेतील मेट्रोभवनाच्या कामाला करत आरेमध्ये भविष्यामध्ये होणाऱ्या प्रस्तावित प्रकल्पांनाही पर्यावरणवाद्यांनी कडाडून विरोध करण्यात आला आहे.

माती परीक्षणाचं काम

आरेमध्ये मेट्रो भवनाच्या कामापूर्वीचं माती परीक्षणाचं काम सुरू आहे. भविष्यामध्ये आरेमध्ये अ‍ॅनीमल कन्झर्वेशन सेंटर, एसआरए प्रकल्प, आरटीओ कार्यालय, भुयारी मार्ग असं काही प्रकल्प येणार असल्याचं आधीच्या सरकारनं स्पष्ट केलं होतं. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आॅक्टोबर महिन्यामध्ये विस्तृत अहवाल मागवला होता. अद्याप हा अहवाल सादर करण्यात आलेला नसल्याचं माहिती समोर येत आहे.

प्रस्तावित प्रकल्पांना विरोध

'आमचा या सर्व प्रस्तावित प्रकल्पांना विरोध आहे आरे हे इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये येत असल्यानं या भागामध्ये कोणताही प्रकल्प येता कामा नये, अन्यथा या भागातील पर्यावरण याचा अनिष्ठ परिणाम होऊ शकतो. जंगल नष्ट करणं सोपं आहे, मात्र हे वाचवणं कठीण आहे. आमचा आरेतील प्रस्तावित सर्वच प्रकल्पांना विरोध आहे', त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.


३२ मजली इमारत

आरेमध्ये मेट्रो भवन ही ३२ मजली इमारत बांधली जाणार आहे. या ठिकाणाहून मुंबईतील मेट्रोच्या १४ मार्गांवर नियंत्रण ठेवण्याचं काम केलं जाणार आहे. यामधील एक मार्ग सध्या पूर्ण झाला असून, उर्वरित १३ मार्गांचं काम प्रगतिपथावर आहे. मुंबईत ३३७ किलोमीटर लांबीचं मेट्रो मार्ग विस्तारलं जाणार आहेत. परंतु, आरे कॉलनी हे इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये येत असल्यानं या ठिकाणी कोणतंही बांधकाम करता येणार नसल्याचं पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे.

मेट्रो भवनाप्रमाणं आमचा आरेतील प्रस्तावित प्रकल्पांनाही विरोध कायम राहणार आहे. एमएमआरडीएची स्वत:ची बीकेसीमध्ये जागा आहे. आरे वगळता मुंबईमध्ये कुठंही मेट्रो भवन उभारता येऊ शकतं. तरीही आरेमध्येच मेट्रोभवन का उभारलं जात आहे, असा सवालही पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केला आहे.

आरे कॉलनी हे इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्यानं या ठिकाणी कोणतंही बांधकाम करता येणार नसल्यानं मेट्रो भवन, कारशेड अथवा अन्य कोणत्याही प्रकल्पाचं बांधकाम आरेमध्ये करता येणार नसल्याचं पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं येथील प्रकल्पांच्या कामांना पर्यावरणवाद्यांचा विरोध कायम राहणार आहे.


हेही वाचा -

हे तर तात्पुरतं खातेवाटप, जयंत पाटील यांचा खुलासा

'या' बँकेमधील ७० खातेदारांचा डेटा लीक, १५ ते २० लाख चोरीला



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा