Advertisement

हे तर तात्पुरतं खातेवाटप, जयंत पाटील यांचा खुलासा

हे खातेवाटप तात्पुरतं असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

हे तर तात्पुरतं खातेवाटप, जयंत पाटील यांचा खुलासा
SHARES

हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होण्याआधी महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप घाईघाईने उरकण्यात आलं. अवघ्या ६ मंत्र्यांच्या खांद्यांवर बहुतेक सर्वच खात्यांचा भार टाकण्यात आलं आहे. त्यावर चर्चा सुरू असताना हे खातेवाटप तात्पुरतं असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. 

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांचं 'वजनदार' मंत्रीमंडळ, 'या' ६ मंत्र्यांमध्येच वाटली सगळी खाती

महाविकास आघाडी सरकारमध्ये खातेवाटप झालेलं नसल्याने हिवाळी अधिवेशनात आम्ही प्रश्न विचारायचे कुणाला? असा प्रश्न उपस्थित करून विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घाईघाईने खातेवाटप केलं. या खातेवाटपानुसार प्रत्येक मंत्र्यांवर ८ ते १० खात्यांचा भार टाकण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात अवघे ६ मंत्री असल्याने बहुतेक सर्व खाती याच मंत्र्यांमध्ये वाटण्यात आली आहे. 

त्यानुसार हिवाळी अधिवेशनात या ६ मंत्र्यांनाच विरोधकांच्या प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार अपेक्षित आहे. तोपर्यंत ही खाती याच मंत्र्यांकडे असणार आहे. जयंत पाटील यांच्याकडे अर्थ आणि गृहनिर्माण ही महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहे.

हेही वाचा- शिवसेनेकडे गृह, तर राष्ट्रवादीकडे अर्थ मंत्रालय

त्यावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, हे खातेवाटप तात्पुरत्या स्वरूपातील असून हिवाळी अधिवेशनानंतर होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर अंतिम खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा