'या' बँकेमधील ७० खातेदारांचा डेटा लीक, १५ ते २० लाख चोरीला

बॅंकेतील ७० खातेदाराचा डेटा चोरीला गेला आहे. तसंच, या डेटाच्या आधारे चोरांनी तब्बल १५ ते २० लाख रुपये वेगवेगळ्या ठिकाणांहून काढल्याची माहिती मिळते.

SHARE

युनियन बँकेच्या खातेदारांचा डेटा लीक झाल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. युनियन बँकेच्या सांताक्रूझ येथील शाखेतील ग्राहकांचा डेटा लीक झाला आहे. बॅंकेतील ७० खातेदाराचा डेटा चोरीला गेला आहे. तसंच, या डेटाच्या आधारे चोरांनी तब्बल १५ ते २० लाख रुपये वेगवेगळ्या ठिकाणांहून काढल्याची माहिती मिळते. भामट्यांनी काढलेल्या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यामुळं बॅंकेच्या ग्राहकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे.

तांत्रिक मदत

या प्रकरणी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर पोलिसांकडून तांत्रिक मदत घेतली जात आहे. युनियन बँकेची सांताक्रूझच्या जुहू तारा रोडवर शाखा आहे. ८ आणि ९ डिसेंबर रोजी खात्यामधून परस्पर पैसे काढण्यात आल्याच्या तक्रारी बँकेकडं येऊ लागल्या. खातेदारांच्या खात्यामधून सुमारे ३ ते १५ हजार आणि त्यापेक्षा अधिक रक्कम काढण्यात आली. त्यावेळी तक्रारदारांची संख्या वाढत गेली आणि या खातेदारांनी शाखेत गर्दी केली.

डेटा चोरीला

एकाच वेळी इतक्या खातेदारांचे पैसे गेले आणि तेदेखील एका शाखेतील खातेदारांचे असल्यानं सर्व्हरच्या माध्यमातून डेटा चोरण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा प्रकार उजेडात येताच युनियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकानं सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार केली. माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच इतर कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरण गंभीर असल्यानं तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे.

बनावट एटीएम कार्ड

चोरण्यात आलेल्या डेटावरून बनावट एटीएम कार्ड तयार करून वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसे काढण्यात आले आहेत. एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यात येत असून त्याआधारे शोध सुरु असलयाची माहिती समोर येत आहे.हेही वाचा -

मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचा फरक

मुख्यमंत्र्यांचं 'वजनदार' मंत्रीमंडळ, 'या' ६ मंत्र्यांमध्येच वाटली सगळी खातीसंबंधित विषय
ताज्या बातम्या