Advertisement

मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचा फरक

मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचा फरक नोंदविण्यात येत आहे

मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचा फरक
SHARES

मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचा फरक नोंदविण्यात येत आहे. माझगाव, दादर आणि पवई या परिसरातील कमाल तापमान २८ अंश तसंच, चेंबूर आणि पवई येथील किमान तापमान १८ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. त्याशिवाय, शुक्रवारी व शनिवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: निरभ्र राहणार असून, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २२ अंशाच्या आसपास राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

'ऊबदार' घाटकोपर

मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपर हे ठिकाण ‘ऊबदार’ म्हणून नोंदविण्यात आलं आहे. गुरुवारी राज्यात सर्वांत कमी किमान तापमान चंद्रपूर इथं १३.२ अंश सेल्सिअस एवढं नोंदविण्यात आलं. मागील २४ तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे.

पावसाची शक्यता

विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानाची लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. १३ ते १४ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहणार असल्यचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. १५ ते १६ डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहणार आहे.



हेही वाचा -

हवं तर मला पक्षातून काढा, पंकजा मुंडेंचं पक्षनेतृत्वालाच आव्हान

मुख्यमंत्र्यांचं 'वजनदार' मंत्रीमंडळ, 'या' ६ मंत्र्यांमध्येच वाटली सगळी खाती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा