Advertisement

जे. जे. रुग्णालयाच्या 'या' विभागांमध्ये अद्ययावत श्रवणयंत्र विभाग

मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात अद्ययावत श्रवणयंत्र विभागाचं उद्घाटन करण्यात आलं आहे.

जे. जे. रुग्णालयाच्या 'या' विभागांमध्ये अद्ययावत श्रवणयंत्र विभाग
SHARES

मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात अद्ययावत श्रवणयंत्र विभागाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. जे. जे. रुग्णालयाच्या कान, नाक, घसा या विभागात अद्ययावत श्रवणयंत्र विभागाचं सोमवारी रुग्णसमूहाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. अद्ययावत श्रवणयंत्र विभागामुळं बहिरेपणाची समस्या असलेल्या सर्व रुग्णांना आधुनिक प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या आधारे निदान व उपचार करण्यात येणार आहेत.

श्रवणदोष पडताळणी प्रक्रिया

अद्ययावत श्रवणयंत्र विभागाप्रमाणचं 'नवजात बालकांसाठी श्रवणदोष पडताळणी प्रक्रिया' या राष्ट्रीय अभियानाचं देखील उद्घाटन करण्यात आलं आहे. त्यामुळं आता लहान मुलांना कोणत्याही प्रकारचा श्रवणदोष असेल तर तो डॉक्टरांच्या लक्षात आणून त्यावर लवकरात लवकर उपचार करता येणार आहे.

बहिरेपणासारख्या समस्या

भविष्यात या मुलांना बहिरेपणासारख्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही. या कार्यक्रमास डॉ. रंजीत माणकेश्वर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे व डॉ. सुनीता बागे आदी वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते.



हेही वाचा -

जामिया हिंसाचार: अक्षयने चुकून केलं ‘या’ व्हिडिओला लाईक, झाला पश्चाताप

PMC घोटाळा : एचडीआयएलच्या प्रवर्तकांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा