Advertisement

जामिया हिंसाचार: अक्षयने चुकून केलं ‘या’ व्हिडिओला लाईक, झाला पश्चाताप

एका व्हिडिओला ट्विटरवर लाईक केल्यामुळे बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या ट्रोल होत आहे. एवढंच नाही, तर त्याच्याविरोधात #BoycotCanadianKumar असा हॅशटॅगही ट्रेंडही होत आहे.

जामिया हिंसाचार: अक्षयने चुकून केलं ‘या’ व्हिडिओला लाईक, झाला पश्चाताप
SHARES

नागरिकता दुरुस्ती कायदाच्या विरोधात रविवारी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात हिंसाचाराच्या घटना घडल्या. या हिंसाचाराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोलीस आणि विद्यार्थ्यांमधील हिंसाचारामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. यांतील एका व्हिडिओला ट्विटरवर लाईक केल्यामुळे बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या ट्रोल होत आहे. एवढंच नाही, तर त्याच्याविरोधात #BoycotCanadianKumar  असा हॅशटॅगही ट्रेंडही होत आहे. 

हेही वाचा- विद्यार्थी असले म्हणून कायदा हाती घेऊ शकत नाही, सरन्यायाधीशांनी सुनावलं

अक्षयने लाईक केलेला व्हिडिओ जामियातील कॅम्पसमधील आहे. या व्हिडिओत पोलिस विद्यार्थ्यांची धरपकड करताना दिसत आहे. पोलिसांना घाबरून विद्यार्थी इकडेतिकडे पळत आहेत. आमच्यावर पोलिसांकडून सातत्याने गोळीबारी आणि अश्रूधुराचा मारा केला जात असल्याचं एक विद्यार्थी या व्हिडिओत म्हणत आहे. या व्हिडिओला अक्षर कुमारच्या ट्विटर हँडलवरून लाईक करण्यात आलं.

हेही वाचा- जामिया आंदोलन: चेतन भगतने दिला सरकारला इशारा, म्हणाला…

मात्र काही वेळातच अक्षयला आपली चूक कळली. त्याने त्वरीत ट्वीटवरून लाईक काढून टाकलं आणि त्यावर 'चूक' असंही म्हटलं. आपल्या कृत्याचा खुलासा करताना अक्षयने दुसरं एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्याने लिहिलं की, 'जामिया मिलिया विद्यार्थ्यांशी संबंधित ट्विट माझ्याकडून चुकून लाईक झालं. मला हे समजताच मी लगेचच चूक दुरूस्त केली. कारण मी कोणत्याही प्रकारे हिंसेचे समर्थन करत नाही.

अक्षय या चुकीमुळे सोशल मीडियावर तो प्रचंड ट्रोल झाला आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा