Advertisement

PMC घोटाळा : एचडीआयएलच्या प्रवर्तकांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) विशेष न्यायालयासमोर ईडीने सुमारे ७ हजार पानांचं आरोपपत्र सादर केलं.

PMC घोटाळा : एचडीआयएलच्या प्रवर्तकांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल
SHARES

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील (पीएमसी) ६७०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) चे प्रवर्तक राकेश वाधवन आणि सारंग वाधवन यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल केले. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) विशेष न्यायालयासमोर ईडीने सुमारे ७ हजार पानांचं आरोपपत्र सादर केलं.

राकेश वाधवन आणि सारंग वाधवन यांच्यावर पीएमएलएच्या विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना प्रारंभी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (इडब्ल्यूए) ने अटक केली होती. या घोटाळ्याची चौकशी करत त्यांना ऑक्टोबरमध्ये ईडीने ताब्यात घेतले होते.

आर्थिक अनियमितता आढळल्याने रिझर्व्ह बँकेने २३ सप्टेंबरला पीएमसी बँकेवर ६ महिन्यांसाठी निर्बंध घातले होते. बँकेचे एकूण १६ लाख खातेदार आहेत. आरबीआयच्या निर्बंधांमुळे खातेधारकांना पैसे काढण्यावरही मर्यादा आली आहे. पीएमसी बँकेने एचडीआयएलला तब्बल ६७०० कोटी रुपयांचं कर्ज दिलं आहे. एचडीआयएल दिवाळखोरीत गेल्यामुळे हे कर्ज वसूल करणं कठीण झालं आहे. त्यामुळे बँकही अडचणीत सापडली. या घोटाळ्याप्रकरणी पीएमसी बँक आणि एचडीआयएलच्या उच्च अधिकाऱ्यांसह बारा जणांना आतापर्यंत अटक केली आहे.



हेही वाचा -

PMC खातेदारांची मातोश्री बंगल्यासमोर निदर्शने

पीएमसीचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण?




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा