Advertisement

पीएमसीचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण?

पीएमसीचे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

पीएमसीचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण?
SHARES

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेच्या खातेधारकांना दिलासा देणारी बातमी आहे. पीएमसीचे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. विलीनीकरणासाठी राज्य सरकारची आरबीआयशी बोलण्याची देखील तयार आहे. पीएमसी बँकेच्या गुंतवणुकदारांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असंही जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं. 

जयंत पाटील म्हणाले की, पीएमसी बँकेच्या राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांशी माझं बोलणं झालं आहे. पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा देण्यासाठी राज्य सहकारी बँकेत पीएमसीचे विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी आवश्यकता वाटल्यास राज्य सरकार रिझर्व्ह बँकेशी बोलणी करेल, असं त्यांच्याशी बोलणं झालं.  विलीनीकरण झाल्यास  ९० टक्के लहान गुंतवणुकदारांना निश्चितपणे मदत होईल. या प्रक्रियेसाठी दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो. राज्य सहकारी बँकेची स्थिती चांगली असल्याने यात काही अडचण येणार नाही, असं ही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, खातेधारकांना होत असलेल्या त्रासासाठी रिझव्‍‌र्ह बँकच जबाबदार आहे, असा आरोप करणाऱ्या खातेधारकांना उच्च न्यायालयाने बुधवारी चपराक लगावली होती. रिझव्‍‌र्ह बँकेला दोष देऊ नक. रिझव्‍‌र्ह बँकेने वेळीच हस्तक्षेप केला नसता आणि पैसे काढण्याच्या मर्यादेवर निर्बंध घातले नसते तर खातेधारकांना आणखी नुकसान सहन करावं लागलं असतं, असं न्यायालयाने म्हटलं. 

 


हेही वाचा  -

PMC घोटाळा : आणखी तिघांना अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा