पंजाब महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेतील (पीएमसी) कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँकेने बँकेवर अनेक निर्बंध घातले होते. त्यामुळं या खातेदारांवर आर्थिक संकट कोसळलं आहे. या आर्थिक संकटातून सुटका होण्यासाठी बॅंकेच्या खातेदारांनी आंदोलनं केली. मात्र, तोडगा निघत नसल्यामुळं राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यासमोर निदर्शने केली.
पंजाब महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या खातेदारांनी रविवारी वांद्रे येथील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केले. त्यावेळी या खातेदारांचं म्हणणं लक्षात घेत उद्धव ठाकरे यांनी खातेदारांना न्याय देण्यासाठी 'राज्य सरकार योग्य ती कार्यवाही करेल’, असं आश्वस्त दिलं.
'खातेदारांना न्याय द्या’, अशी मागणी या खातेदारांनी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी खातेदारांच्या प्रतिनिधींना 'मातोश्री'त बोलावून चर्चा केली. तसंच राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत खातेदारांना न्याय देईल, याबाबतची कार्यवाही तातडीनं केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळं पीएमसी बॅंकेच्या खातेदारांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा -
नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल यांची निवड
सत्तेसाठी किती लाचारी? सावरकर वादावरून फडणवीसांची शिवसेनेवर टीका