Advertisement

फडणवीसांनी घाेटाळेबाजांना क्लीन चीट द्यायचंच काम केलं, सचिन सावंत यांचा आरोप

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोटाळेबाजांना नेहमीच क्लीन चीट द्यायचं काम केलं, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

फडणवीसांनी घाेटाळेबाजांना क्लीन चीट द्यायचंच काम केलं, सचिन सावंत यांचा आरोप
SHARES

मागील सरकारच्या ५ वर्षांच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीने अनेक घोटाळ्यांचा पदाफार्श केला. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोटाळेबाजांना नेहमीच क्लीन चीट द्यायचं काम केलं, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.  


सध्या शिवस्मारकावरून भाजपवर घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत, त्याबदद्दल बोलताना सावंत म्हणाले, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक व्हावं, अशी काँग्रेसची देखील इच्छा आहे. परंतु भाजप सरकारने या कामाचं टेंडर निघाल्यावर वाटाघाटी करून पैसे कमी केले. शिवस्मारकाची उंची देखील कमी केली. महाराजांच्या स्मारकाच्या कामात घोटाळा करणाऱ्या भाजपला जनता कधीही माफ करणार नाही.

हेही वाचा- शिवस्मारकात भ्रष्टाचार नाही, चौकशीला सामोरे जाण्यास तयार- चंद्रकांत पाटील

भाजप वीर सावरकर यांच्या नावाचा उपयोग राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोप सावंत यांनी केला. सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांना त्यांच्याबद्दल किती माहिती आहे हे मला ठाऊक नाही. परंतु सावरकर यांची बदलत गेलेली भूमिका आम्हाला मान्य नसल्याचं सावंत म्हणाले. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा