Advertisement

शिवस्मारक घोटाळा पार्ट- २, महाआघाडीचा भाजपवर पुन्हा भ्रष्टाचाराचा आरोप

मुंबईजवळील अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्पात १ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी केला.

शिवस्मारक घोटाळा पार्ट- २, महाआघाडीचा भाजपवर पुन्हा भ्रष्टाचाराचा आरोप
SHARES

मुंबईजवळील अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्पात १ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी केला. या घोटाळ्यावर दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन दोन्ही पक्षांकडून राज्य सरकारवर आरोप करण्यात आले.

शिवस्मारकाच्या कामात सरकारने घोटाळा केल्याचा आरोप गेल्या पत्रकार परिषदेत आम्ही केला होता. या घोटाळ्याचा पार्ट - २ आम्ही काढणार असेही मागच्या वेळ नमूद केला होतं. त्यानुसार आज पुन्हा या भ्रष्ट सरकारचा भांडाफोड केल्याचं मलिक यांनी सांगितलं.

 पैसे कमी केल्याचं भासवलं

शिवस्मारकाच्या टेंडरची मूळ रक्कम २६९२ कोटी रुपये इतकी कमी असतानाही टेंडरच्या रकमेचा आकडा फुगवून ३८२६ कोटी रुपये दाखवण्यात आला. त्यानंतर L&T कंपनीने टेंडर भरताना २५०० कोटी रुपये कमी करत ४२ टक्क्याने टेंडर भरतो असं भासवलं. प्रत्यक्षात १२०० कोटी रुपयेच कमी केले. एवढंच नाही, तर राज्य सरकारने देखील वाटाघाटीत रक्कम कमी करून शासनाचे पैसे वाचवल्याचं भासवल्याचं सावंत म्हणाले.

कोर्टात दाद मागणार

शिवस्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमासाठी नाही तर पैसे खाण्यासाठी होता हे स्पष्ट झाले आहे. शिवस्मारकाच्या घोटाळ्यासंदर्भात आम्ही जे आरोप याआधी केले होते त्यावर सरकारतर्फे कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी आमच्या आरोपांची दखलही घेतली नाही. त्यांनी उत्तर देणं टाळलं याचाच अर्थ आम्ही केलेले आरोप खरे आहेत हे आता स्पष्ट झाले आहे. हा सरकारचा वेल प्लान्ड भ्रष्टाचार आहे. लवकरच याबाबत आम्ही सीवीसीकडे तक्रार करणार आहोत. जर दखल घेतली गेली नाही तर कोर्टात दाद मागणार आहोत, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.



हेही वाचा- 

भाजपवर पहिल्यांदाच भ्रष्टाचाराचा मोठा आरोप, काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र पत्रकार परिषद

ईडीची शाखा भाजप कार्यालयात सुरू करा, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची भाजपवर टीका



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा