भाजपवर पहिल्यांदाच भ्रष्टाचाराचा मोठा आरोप, काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र पत्रकार परिषद

भाजपने मुंबईत उभ्या राहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

SHARE

भाजपने मुंबईत उभ्या राहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काम सुरू झालं कुठं? 

ज्यांचं नाव घेऊन भाजप-शिवसेना सत्तेत आले, त्याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामात भाजपने भ्रष्टाचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन करण्यात आलं होतं. पण, तेव्हापासून अद्याप स्मारकाचं काम सुरूच झालेलं नाही. उलट शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.

कागदपत्रे सादर

एवढंच नाही, तर शिवस्मारकाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची कागदपत्रेच मलिक यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. हिंमत असेल तर आजच मुख्यमंत्र्यांनी या आरोपाचा खुलासा करावा, असं आव्हानही त्यांनी दिलं. आम्ही दुसऱ्या टप्प्यात आणखी कागदपत्रे सादर करणार आहोत, असं सांगताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मेट्रो विभागातही भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला.

भाजपचं उत्तर काय?

मागील ५ वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही आरोप राज्य सरकारवर झालेला नाही, असा दावा नेहमीच भाजपच्या नेत्यांकडून केला जातो. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या आरोपांना भाजपकडून काय उत्तर देण्यात येतं, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हेही वाचा-

वारांनी मला ‘हे’ दिलं, तर मी निवडणूकच लढवणार नाही- उदयनराजे

भारत-पाकिस्तानची फाळणी सोपी, पण युतीचं जागावाटप भयंकर - संजय राऊतसंबंधित विषय
ताज्या बातम्या