Advertisement

भारत-पाकिस्तानची फाळणी सोपी, पण युतीचं जागावाटप भयंकर - संजय राऊत

भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेली फाळणी एकवेळेस सोपी होती; परंतु भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटप त्यापेक्षाही भयंकर असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

भारत-पाकिस्तानची फाळणी सोपी, पण युतीचं जागावाटप भयंकर - संजय राऊत
SHARES
भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेली फाळणी एकवेळेस सोपी होती; परंतु भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटप त्यापेक्षाही भयंकर असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखेची घोषणा नुकतीच निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार राज्यात २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असून २४ तारखेला मतमोजणी होणार आहे. निवडणुकांची घोषणा होताच राज्यात आचारसंहीता देखील लागू झाली आहे. परंतु अजूनही शिवसेना-भाजपात जागा वाटपाची चर्चा पूर्ण होऊ शकलेला नाही. 

काय म्हणाले राऊत?

याबाबत खा. संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, महाराष्ट्र खूप मोठा आहे. त्यामुळे विधानसभेच्या २८८ जागांवर खल करणं सोपं काम नाही. बऱ्याचशा जागांबाबत एकमत झालं असून पुढच्या २४ तासांत जागा वाटपावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे. एकवेळेस फाळणी सोपी, पण युतीतील जागावाटपाचं काम त्यापेक्षाही कठीण आहे, असं राऊत म्हणाले. 

विरोधी पक्षात असतो तर

 आम्ही सत्तेत सहभागी होण्याऐवजी जर विरोधी पक्षात असतो, तर राज्यात वेगळं चित्र दिसलं असतं. पण युतीबाबत काहीही ठरल्यास त्याची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात येईल, असंही राऊत म्हणाले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेला जास्तीत जास्त १३० जागा सोडण्यास भाजप तयार झाल्याची माहिती मिळत आहे. तर मित्रपक्षांना १८ जागा सोडून भाजप १४० जागा लढवण्याची शक्यता आहे. 



हेही वाचा-

महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ तारखेला मतमोजणी

Vidhan Sabha Election 2019: शिवसेनेची ११८ जागांवर बोळवण?



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा