महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ तारखेला मतमोजणी

महाराष्ट्रात निवडणुकांच बिगुल वाजलं आहे. २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचं मतदान होणार असून, २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

SHARE

महाराष्ट्रात निवडणुकांच बिगुल वाजलं आहे. २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचं मतदान होणार असून, २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. शनिवारपासून महाराष्ट्रात आचारंसहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान दिवाळीपूर्वीच जाहीर केला जाणार आहे. त्यामुळं कोणाची दिवाळी गोड होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

२८८ जागांसाठी मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगानं शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्रातील निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. ९ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी ८.९४ कोटी मतदारांनी नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम

  • निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची तारीख – २७ सप्टेंबर
  • उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख – ४ ऑक्टोबर
  • अर्जांची छाननी – ५ ऑक्टोबर
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत – ७ ऑक्टोबर
  • मतदान – २१ ऑक्टोबर
  • मतमोजणी – २४ ऑक्टोबर
संबंधित विषय
ताज्या बातम्या