Advertisement

पवारांनी मला ‘हे’ दिलं, तर मी निवडणूकच लढवणार नाही- उदयनराजे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यातील लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीला उभे राहिले, तर त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार नाही, असं वक्तव्य साताऱ्यातील भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी केलं.

पवारांनी मला ‘हे’ दिलं, तर मी निवडणूकच लढवणार नाही- उदयनराजे
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यातील लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीला उभे राहिले, तर त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार नाही, असं वक्तव्य साताऱ्यातील भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी केलं. 

साताऱ्यातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या उदयनराजेंनी नुकताच खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या रिक्त जागेवर २१ आॅक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना नुकतीच निवडणूक आयोगाने जारी केली आहे. ही निवडणूक विधानसभा निवडणुकीसोबतच होत असल्याने उदयनराजेंना त्याचा फायदा मिळणार आहे.

यासंदर्भात पत्रकारांनी उदयनराजेंना विचारलं असता, ते म्हणाले की, शरद पवारांबद्दल मला कालही आदर होता. आजही आहे आणि उद्याही राहील. पवार हे मला वडिलधाऱ्यांच्याच स्थानी आहेत. ते निवडणुकीला उभे राहणार असतील तर मी लढणार नाही. मात्र माझी एकच अट आहे, ती म्हणजे त्यांनी मला त्यांचा दिल्लीतील बंगला आणि गाडी मला वापरू द्यावी. 



हेही वाचा-

नाराज उदयनराजेंच्या जीवात जीव, साताऱ्याची पोटनिवडणूक जाहीर

मिलिंद देवराही भाजपच्या वाटेवर? केलं मोदींचं कौतुक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा