Advertisement

नाराज उदयनराजेंच्या जीवात जीव, साताऱ्याची पोटनिवडणूक जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबरच घेण्याची घोषणा केल्याने उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाराज उदयनराजेंच्या जीवात जीव, साताऱ्याची पोटनिवडणूक जाहीर
SHARES

केंद्रीय निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबरच घेण्याची घोषणा केल्याने उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उदयनराजेंनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून पायउतार होत भाजपाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.  

आधी नाराजी

भाजपमध्ये जाण्याआधी साताऱ्यातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. निवडणूक आयोगाने २१ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली. परंतु  सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्याने उदयनराजे काहीसे नाराज होते.

मेळाव्याला दांडी

यामुळेच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पश्चिम महाराष्ट्र मेळाव्याला उदयनराजे गैरहजर राहिले. नड्डा यांच्या उपस्थितीत या मेळाव्याला हर्षवर्धन पाटील, रणजित मोहिते पाटील आणि धनंजय महाडीक हजर असताना उदयनराजेंनी मात्र दांडी मारली.

अधिसूचना जाहीर

मात्र मंगळवार २४ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर करताना निवडणूक आयोगाने साताऱ्यातील पोटनिवडणूक देखील विधासभेसोबत घेण्याचे जाहीर केलं आहे. राज्यातील स्थानिक सण, महोत्सव, मतदारसंघातील याद्यांचं काम आणि हवामानाची स्थिती पाहता आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

‘असा’ असेल कार्यक्रम

निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार, शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी राजपत्रित अधिसूचना निघणार असून, ४ ऑक्टोबर या दिवशी नामांकन पत्र भरण्याचा दिवस आहे. तर शनिवारी, ५ ऑक्टोबर या दिवशी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारिख आहे ७ ऑक्टोबर. विधानसभा निवडणुकीसोबतच २१ ऑक्टोबरला सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात येणार असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी आणि २७ ऑक्टोबरला निकाल घोषित करण्यात येणार आहे.



हेही वाचा-

एमआयएमची पहिली यादी जाहीर, 'हे' आहेत मुंबईतील ५ उमेदवार

महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ तारखेला मतमोजणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा