Advertisement

युतीची चिंता मलाही- मुख्यमंत्री

तुमच्याप्रमाणे मलाही युतीची चिंता असून युतीबाबतचा निर्णय योग्य वेळी घोषित करु,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

युतीची चिंता मलाही- मुख्यमंत्री
SHARES

तुमच्याप्रमाणे मलाही युतीची चिंता असून युतीबाबतचा निर्णय योग्य वेळी घोषित करु,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या आर्थिक निर्णयांचं स्वागत केलं.

धाडसी निर्णय

अर्थमंत्र्यांनी कॉर्पोरेट टॅक्स २२ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याने उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचा महाराष्ट्राला फायदा होणार असून गुंतवणूक वाढण्यास मदत होईल. या बद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानले. 

 गेल्या २ वर्षांत जागतिक कंपन्या महाराष्ट्रात आल्या असून अमेरिका-चीनमधील ट्रेड वॉरमुळे भारतातील गुंतवणूक वाढत असून २२ टक्क्यांचा सर्वात मोठा फायदा राज्याला होईल, असंही ते म्हणाले.

राणेंचा प्रवेश लवकरच

शिवसेना-भाजपची युती केव्हा होणार, राणेंचा भाजप प्रवेश होणार की नाही या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, युतीची चिंता आम्हालाही आहे. युतीबाबतचा निर्णय लवकरच घोषित होईल तसंच नारायण राणेंच्या पक्षप्रवेशाबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

आरेला विरोध का?

आरेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आरेतील मेट्रो ३ च्या कारशेडला विरोध करणाऱ्यांच्या मनात नेमकं आहे तरी काय? हे कळत नाही. आरेचा विरोध करणाऱ्या १३ हजार आॅनलाइन तक्रारींमधून १० हजार तक्रारी एकाच आयपी अॅड्रेसवरून आल्याचं त्यांनी सांगितलं.हेही वाचा-

आधी मुंबईतील खड्डे भरा; मग महाराष्ट्र घडवा! मुंबईकरांकडून आदित्य ठाकरे ट्रोल

अमिताभच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या २३ तरूणांवर गुन्हाRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement