Advertisement

आधी मुंबईतील खड्डे भरा; मग महाराष्ट्र घडवा! मुंबईकरांकडून आदित्य ठाकरे ट्रोल

शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आपल्या एका ट्विटवरून आदित्य यांना ट्रोलकऱ्यांचा सामना करावा लागतोय.

आधी मुंबईतील खड्डे भरा; मग महाराष्ट्र घडवा! मुंबईकरांकडून आदित्य ठाकरे ट्रोल
SHARES

शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आरे काॅलनीतील झाडांच्या कत्तलीवरून सध्या त्यांनी भाजपला चांगलंच कोंडीत पकडलंय. पण आपल्या एका ट्विटवरून आदित्य यांना ट्रोलकऱ्यांचा सामना करावा लागतोय. 

काय म्हणाले आदित्य?

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या आहेत. या तारखा जाहीर होताच आदित्य यांनी “हीच ती वेळ नवा महाराष्ट्र घडवण्याची ” असं ट्विट केलं. या ट्विटवरून आदित्य यांना नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं. 

हॅलिकाॅप्टरने या

आधी खड्डे भरा, किंवा हॅलिकाॅप्टरने मत मागायला या, असं म्हणत आदित्य यांना सुचवलं आहे. तर एका नेटकऱ्याने आधी आमचं कल्याण-डोंबिवली खड्डेमुक्त करा मग नवीन महाराष्ट्र घडवायंच बघा.. असा खोचक सल्ला दिला आहे. 

कारशेडला विरोध

मेट्रो ३ साठी आरे काॅलनीत कारशेड उभारण्यावरून आदित्य यांनी भाजपला चांगलाच धारेवर धरलं आहे. कारशेड उभारण्याकरीता  होणाऱ्या झाडांच्या कत्तलीमुळे इथली जीवसृष्टी नष्ट होईल, असं म्हणत आदित्य यांनी या विषयाला चांगलीच हवा दिली आहे. 



हेही वाचा-

‘इथं’ नोंदवा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या तक्रारी, महापालिकेने आणलं ‘हे’ अॅप

मुंबईतील खड्डेही महागडे! एक खड्डा बुजवण्यासाठी २ लाख ३ हजार ९६६ रुपये खर्च



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा