मुंबईतील खड्डेही महागडे! एक खड्डा बुजवण्यासाठी २ लाख ३ हजार ९६६ रुपये खर्च

मुंबईतील रस्त्यांवरील ९० टक्के खड्डे बुजवल्याचा दावा महापालिकेने केला आहे. परंतु यांत घोटाळा झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी केला आहे.

 • मुंबईतील खड्डेही महागडे! एक खड्डा बुजवण्यासाठी २ लाख ३ हजार ९६६ रुपये खर्च
SHARE

शहरातील रस्त्यांवर पडणारे खड्डे मुंबईकरांसाठी नवे नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची चाळण होते आणि महापालिका हे खड्डे बुजवण्यासाठी लाखो रुपये खर्च करते. यंदा मुंबईतील रस्त्यांवरील ९० टक्के खड्डे बुजवल्याचा दावा महापालिकेने केला आहे. परंतु यांत घोटाळा झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी केला आहे. 

महापालिकेने १० जून ते १ आॅगस्ट २०१९ दरम्यान रस्त्यावर पडलेल्या २६४८ खड्ड्यांपैकी २३३४ खड्डे बुजवले असून केवळ ४१४ खड्डेच शिल्लक असल्याचा दावा केला होता.  

परंतु शेख यांनी माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहितीनुसार, महापालिकेचा दावा आणि प्रत्यक्षात नोंदणी झालेल्या खड्ड्यांच्या आकड्यांमध्ये विसंगती दिसून येत आहे. महापालिकेचे सहायक अभियंता आणि माहिती अधिकारी य.प.जुन्नरकर यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार २०१३ ते जुलै २०१९ दरम्यान मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या एकूण २४१४६ आॅनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी २३३८८ खड्डे भरण्यात आले. तर १ एप्रिल २०१९ ते ३१ जुलै २०१९ दरम्यान खड्ड्यांच्या २६६१ आॅनलाइन तक्रार प्राप्त झाल्या. त्यापैकी २४६२ खड्डे भरण्यात आले असून केवळ ११९ खड्डे शिल्लक आहेत. 

वर्षानुसार प्राप्त झालेल्या ऑनलाईन तक्रार आणि कार्यवाही 

 • एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ - एकूण २३०० खड्डे भरल्याच्या तक्रारी आल्या आणि १५५६ खड्डे भरले गेले, केवळ ३५ खड्डे भरायचे बाकी आहेत.
 • एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ - एकूण २०९३ खड्ड्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आणि २०९८खड्डे भरले गेले, ही धक्कादायक बाब म्हणजे प्राप्त झालेल्या तक्रारींपेक्षा ५ खड्डे जास्त भरले गेले.
 • एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ - एकूण १५९३ खड्डे भरल्याच्या तक्रारी आल्या आणि १५८३ खड्डे भरले गेले, केवळ १५ खड्डे भरायचे बाकी आहेत.
 • एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ - एकूण ६५४४ खड्डे भरल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आणि ६०९८ खड्डे भरले गेले, केवळ ४४६ खड्डे शिल्लक आहेत.
 • एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ - एकूण ४०४५खड्डे प्राप्त झाले आणि ३९८१ खड्डे भरले गेले, केवळ ६४ खड्डे भरले गेले.
 • एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ - एकूण ४९१० खड्डे प्राप्त झाले आणि ४८९८ खड्डे भरले गेले, केवळ १२ खड्डे भरायचे राहिले.
 • एप्रिल २०१९ ते ३१ जुलै २०१९ - एकूण २६६१ खड्डे प्राप्त झाले आणि २४६२खड्डे भरले गेले, केवळ १९९खड्डे भरायचे बाकी आहेत. 

तसंच २०१३ ते २०१९ - मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी एकूण १७५ कोटी ५१ लाख ८६हजार बजेट खर्च झाले असून आतापर्यंत खड्डे भरण्यासाठी एकूण ११३ कोटी ८४ लाख ७७ हजार रुपये खर्च झाले आहेत.

अंदाजे अंदाजपत्रक आणि वर्षानुसार खर्च 

 • एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ - अंदाजे बजेट ५० कोटी, ४६ कोटी २५ लाख ९७ हजार रुपये खर्च झाले.
 • एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ - अंदाजे बजेट,३९ कोटी 24 लाख 26 हजार, खर्च 34 कोटी 16 लाख 92 हजार रुपये.
 • एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ - अंदाजे बजेट ३५ कोटी, खर्च १० कोटी ६१ लाख २७ हजार रुपये.
 • एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ - बजेट ९ कोटी ५ लाख ८६ हजार, खर्च ६ कोटी ९४ लाख ९७ हजार रुपये.
 • एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ - अंदाजे १० कोटी ५० लाख बजेट, खर्च ७ कोटी ७३ लाख २२ हजार रुपये.
 • एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ - अंदाजे ११ कोटी ७० लाख बजेट, खर्च ७ कोटी ९८ लाख ७ हजार.
 • एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० - अंदाजे ४० कोटी बजेट ,त्यात १४ लाख ३५ हजार रुपये इतका खर्च झाला आहे.हेही वाचा-

स्थायी समितीत ५५० कोटींचे प्रस्ताव मंजूर, आचारसंहितेआधी निर्णयांचा धडाका

प्रकल्पबाधीतांचं माहुलमध्ये स्थलांतर अयोग्यसंबंधित विषय
ताज्या बातम्या