Advertisement

कोकणात जाणाऱ्या वंदे बारत एक्स्प्रेसच्या फेऱ्यांमध्ये वाढ

आता दिवाळीच्या कालावधीत वंदे भारतच्या फेऱ्या वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कोकणात जाणाऱ्या वंदे बारत एक्स्प्रेसच्या फेऱ्यांमध्ये वाढ
SHARES

दिवाळीत वंदे भारतच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

वंदे भारत ही देशातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवासाचा कालावधी खूप वाचला आहे. यामुळे अनेक प्रवासी वंदे भारतने प्रवास करतात. प्रवाशांकडून ट्रेनला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यामुळे अनेक ट्रेनचे कोचदेखील वाढवण्यात आले आहेत.

आता दिवाळीच्या कालावधीत वंदे भारतच्या फेऱ्या वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या वंदे भारत ट्रेन आठवड्यातून तीन दिवस चालवली जाते. जून ते ऑक्टोबर या कालावधीत आठवड्यातून तीन दिवस ट्रेन चालवली जाते. त्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यापासून वंदे भारत ट्रेनची संख्या वाढणार आहे. आता 22 ऑक्टोबरपासून फक्त शुक्रवार वगळता संपूर्ण आठवडा ही ट्रेन चालवली जाणार आहे.

सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेस गाडी क्रमांक 22229 वेळापत्रकानुसार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी चालवली जाणार आहे.

5 वाजून 25 मिनिटांनी ही ट्रेन सुटणार आहे. दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी ही ट्रेन मडगाव गोवा स्थानक येथे पोहचणार आहे. तर गाडी क्रमांक 22230 मडगाववरुन शुक्रवार सोडून इतर दिवशी चालवली जाणार आहे. ही ट्रेन दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी सुटणार आहे. रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी ही ट्रेन मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल, यामुळे कोकणवासीयांना फायदा होणार आहे.



हेही वाचा

मुंबई लोकलवर दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ

पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त नवी मुंबईत वाहतुकीत बदल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा