Advertisement

फेब्रुवारीत सलग दुसऱ्या दिवशी उच्चांक तापमानाची नोंद

तापमान 36°C पार, आठवड्याअखेरीस 5 अंशांनी घटण्याची शक्यता

फेब्रुवारीत सलग दुसऱ्या दिवशी उच्चांक तापमानाची नोंद
SHARES

सलग दुसऱ्या दिवशी रविवारी मुंबईत या महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.

India Meteorological Department (IMD) च्या माहितीनुसार, सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान 36.3°C इतके नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा 4.3°C ने अधिक होते. तर कुलाबा वेधशाळेत 34.8°C कमाल तापमानाची नोंद झाली, जे सरासरीपेक्षा 4.2°C ने जास्त होते.

आठवड्याच्या उत्तरार्धात तापमानात 4 ते 5 अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे होत असलेल्या संक्रमणामुळे पाऱ्यात अचानक बदल होत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

गेल्या दशकातील फेब्रुवारी महिन्यातील हे तिसरे सर्वाधिक तापमान ठरले आहे. महाराष्ट्रातीलही हे उच्चांकी तापमानांपैकी एक आहे. IMD ने विदर्भ भागात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. मात्र, मुंबई आणि महानगर प्रदेशासाठी अद्याप कोणतीही अधिकृत चेतावणी जारी करण्यात आलेली नाही.

पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठीच्या अंदाजानुसार, आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी धूसर वातावरण (हॅझ) राहू शकते. कमाल तापमान सुमारे 35°C तर किमान तापमान सुमारे 20°C राहण्याचा अंदाज आहे.

हवामानातील बदलामुळे हवेच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला असून, रविवारी मुंबईचा एकूण वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) 118 नोंदवला गेला. काही भागांमध्ये AQI 150 च्या पुढे गेला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, रविवारी ज्या भागांमध्ये AQI जास्त होता ते भाग पुढीलप्रमाणे —

  • वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (166)

  • देवनार (157)

  • नेव्ही नगर-कुलाबा (157)

  • चकाला-अंधेरी पूर्व (150)

  • मालाड पश्चिम (150) आदी.

IMD मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले, “सध्या मुंबई आणि एमएमआरमध्ये पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नसली तरी हवामानातील संक्रमणामुळे येत्या काही दिवसांत पावसासह मेघगर्जनेची शक्यता आहे.”

स्वतंत्र हवामान विश्लेषक रुशीकेश आग्रे यांनी त्यांच्या ट्विटरमधील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “फेब्रुवारी महिना आतापर्यंत रोलर कोस्टरसारखा राहिला आहे. गेल्या तीन आठवड्यांत तापमानात तीव्र वाढ आणि घट पाहायला मिळाली.”

आग्रे यांनी पुढे नमूद केले की, “बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र (LPA) तयार झाले असून ते पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि कोकणात पुढील 48 तास अंशतः ढगाळ किंवा बहुतांश उन्हाळी वातावरण राहील. तोपर्यंत तापमान उच्च राहील.”



हेही वाचा

हवेची गुणवत्ता घसरली

वायू प्रदूषण रोखण्यासाठी वर्षभर रस्ते धुण्यात येणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा