स्थायी समितीत ५५० कोटींचे प्रस्ताव मंजूर, आचारसंहितेआधी निर्णयांचा धडाका

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी ५५० कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहीता केव्हाही लागू होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारप्रमाणे मुंबई महापालिकेतही निर्णयांचा धडाका लावण्यात आला.

SHARE

'या' कामांसाठी निधी 

घनकचरा व्यवस्थापन, वैद्यकीय सुविधा, प्राथमिक शिक्षण, रुग्णालयांसाठी विविध यंत्रे आणि पुस्तकांची खरेदी, शौचालय बांधणी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रेन वाॅटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारण्यासाठी वनखात्याला अधिदान, बेस्टला अनुदान इ. विकासकामांचे १५४ प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले.

बेस्टला अनुदान

बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. त्यानुसार महापालिकेने बसखरेदी व इतर कामांसाठी ६०० कोटी, कर्जफेड करण्यासाठी ११३६ कोटी असे आतापर्यंत एकूण १७०० कोटी रुपये बेस्टला दिले आहेत. त्यानंतर पुन्हा ४०० कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. याबाबतचा प्रस्ताव सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.हेही वाचा-

बेस्ट कामगारांचा सामंजस्य कराराला नकार, संपावर जाण्याची शक्यता

मुंबई महापालिकेच्या तिजोरीत १२ हजार कोटींची भर, पैसे खर्च करायचे कुठं? महापालिकेला प्रश्नसंबंधित विषय
ताज्या बातम्या