Advertisement

बेस्ट कामगारांचा सामंजस्य कराराला नकार, संपावर जाण्याची शक्यता

बेस्ट उपक्रमाच्या २०१६ ते २०२१ कालावधीतील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यास बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं नकार दिला.

बेस्ट कामगारांचा सामंजस्य कराराला नकार, संपावर जाण्याची शक्यता
SHARES

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुन्हा एकदा बेस्ट कामगारांच्या संपाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कारण बेस्ट उपक्रमाच्या २०१६ ते २०२१ कालावधीतील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यास बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं नकार दिला. बेस्ट कामगार सेनेनं मान्य केलेला हा सामंजस्य करार कामगारांसाठी घातक असल्याची भूमिका समितीनं घेतली आहे. तसंच, औद्योगिक विवाद कायद्यानुसार बेस्ट उपक्रमास संपाची कायदेशीर नोटीस देण्याचा निर्णयही समितीनं जाहीर केला आहे.

सहमतानं करारास नकार

मुंबईतील परळ येथील बेस्ट कामगार मेळाव्यात कामगारांनी सहमतानं करारास नकार दर्शविला आहे. मात्र, हा करार बेस्ट कामगार सेनेने मान्य केला आहे. बेस्ट कामगार सेनेनं सहमती दर्शवलेल्या सामंजस्य करारानुसार कामगारांना ५ ते १२ हजार रुपयांपर्यंत पगारवाढ मिळण्याचा दावा करण्यात आला आहे.

मोठं नुकसान

मात्र, सोमवारी कामगार मेळाव्यात उपस्थित कामगारांनी या सामंजस्य करारावर नापसंती व्यक्त केल्याची माहिती समोर येते.  हा सामंजस्य करार कामगार हिताचा नसून, त्यातून मोठं नुकसान होणार असल्याचा आक्षेप देखील नोंदवण्यात आला आहे. या करारामुळं मोठ्या स्तरावरील कामगारांना देय देण्यांध्ये प्रचंड नुकसान होणार असल्याची भितीही व्यक्त करण्यात आली आहे.हेही वाचा -

मुंबईत पावसाचा नवा विक्रम, सप्टेंबरचा पाऊस १० वर्षांतील सर्वाधिकRead this story in हिंदी
संबंधित विषय