Advertisement

मुंबईत पावसाचा नवा विक्रम, सप्टेंबरचा पाऊस १० वर्षांतील सर्वाधिक

यंदा सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसानं सप्टेंबर महिन्याची सरासरी ओलांडूली असून, मुंबईच्या पावसानं नवा विक्रम रचला आहे.

मुंबईत पावसाचा नवा विक्रम, सप्टेंबरचा पाऊस १० वर्षांतील सर्वाधिक
SHARES

मुंबईसह उपनगरात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला सुरू झालेल्या पावसानं दमदार हजेरी लावली. यंदा सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसानं सप्टेंबर महिन्याची सरासरी ओलांडूली असून, मुंबईच्या पावसानं नवा विक्रम रचला आहे. केवळ ९ सप्टेंबरपर्यंत पडलेला पाऊस मागील १० वर्षांतील सर्वाधिक दुसरा क्रमांकाचा पाऊस आहे. सांताक्रूझ वेधशाळेत १ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर सोमवारी सकाळपर्यंत ७३६.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहेही आकडेवारी पाहता सप्टेंबरच्या पावसानं १० वर्षांतील सर्वाधिक पावसाचा विक्रम मोडला आहे.

पावसाचं प्रमाण जास्त 

सोमवारी मुंबई उपनगरातील अनेक भागांमध्ये पावसाचं प्रमाण जास्त होतं. गोरेगाव इथं ४१., अंधेरी पूर्व इथं ४७.९७, मरोळ इथं ४८ तर विक्रोळी इथं ४४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळेत मुंबईमध्ये १०.९४ मिमी, पूर्व उपनगरांमध्ये ३२.६२ तर पश्चिम उपनगरांमध्ये ३६.३१ मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला.

७५६ मिमी पाऊस

याआधी २०१६मधील सप्टेंबर महिन्यात ७५६ मिमी पाऊस नोंदवला गेला होता. हा गेल्या दहा वर्षांतील सप्टेंबरमधील सर्वाधिक पाऊस होता. मात्र, ९ सप्टेंबरला सकाळी ८.३० पर्यंत ७३६.६ मिलीमीटर पाऊस पडला. दुपारनंतर पावसानं विश्रांती घेतली.

आणखी किती पाऊस कोसळणार?

सोमवारी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० यादरम्यान सांताक्रूझ इथं ५१.२ मिलीमीटर तर कुलाबा इथं ३.२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळं या पावसाचा विचार करता १० सप्टेंबरपर्यंतचा पाऊस ७८७ मिलीमीटरहून अधिक आहे. दरम्यान, सप्टेंबर महिना संपायला आणखी काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळं मुंबईमध्ये आणखी किती पाऊस कोसळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.



हेही वाचा -

‘आरएसएस’च्या लोकांमुळे आमची युती तुटली- जलील



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा