Advertisement

मुंबई महापालिकेच्या तिजोरीत १२ हजार कोटींची भर, पैसे खर्च करायचे कुठं? महापालिकेला प्रश्न

देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीत मुदत ठेवींच्या माध्यमातून १२ हजार कोटी रुपयांची भर पडली आहे.

मुंबई महापालिकेच्या तिजोरीत १२ हजार कोटींची भर, पैसे खर्च करायचे कुठं? महापालिकेला प्रश्न
SHARES

देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीत मुदत ठेवींच्या माध्यमातून १२ हजार कोटी रुपयांची भर पडली आहे. यामुळे महापालिकेच्या ठेवींचा आकडा वाढून ७९ हजार कोटी रुपयांवर गेला आहे. महापालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी हा निधी राखून ठेवण्यात आला आहे. 

७ टक्के दराने व्याज

मागील २ वर्षांमध्ये मुदत ठेवींच्या रकमेत १२ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ही रक्कम विविध बँकांमध्ये १५ महिन्यांसाठी मुदत ठेव म्हणून ठेवण्यात आली आहे. या रकमेवर महापालिकेला ७ टक्के दराने व्याज मिळते. 

‘या’ कामांसाठी निधी राखीव

महापालिकेकडे असलेल्या ७९ हजार कोटी रकमेपैकी ५२ हजार कोटी रुपयांची रक्कम पायाभूत प्रकल्पांसाठी, तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतन आणि विविध योजनांसाठी १२ हजार ९६३ कोटी रुपयांची रक्कम राखून ठेवण्यात आली आहे. एवढी मोठी रक्कम वापराविना पडून रहात असल्याने ही रक्कम सरकारी निकषानुसार गुंतवण्याचा महापालिका प्रशासन विचार करत असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

महापालिकेचा राखीव निधी ‘असा’ 

  • जूनपर्यंत विविध बँकांमध्ये ७९ हजार ९१ कोटी रुपयांच्या ठेवी
  • कॅनरा बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब अॅण्ड सिंध बँक, इंडियन ओवरसीज बँक, सिंडीकेट बँक, काॅर्पोरेशन बँक, ओरिएंटल बँक या बँकांमध्ये मुदत ठेवी
  • मुदत ठेवींवर ७ टक्के दराने मिळतं व्याज
  • मागील २ वर्षांत १२ हजार कोटी रुपयांची वाढ
  • कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, प्रस्तावित पाणी प्रकल्प इ. प्रकल्पांसाठी ५२ हजार कोटी रुपये राखीव
  • कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेत, भविष्य निर्वाह निधी इ. योजनांसाठी १२,९६३ कोटी रुपये राखीव
  • महापालिकेची राज्य सरकारकडे ४३३१.३४ कोटी रुपयांची थकबाकीहेही वाचा-

मिठी नदीचा पूर रोखणार, महापालिका बांधणार कृत्रिम तलाव

महापालिकेची २३ उद्यानं राहणार २४ तास खुलीRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा