Advertisement

महापालिकेची २३ उद्यानं राहणार २४ तास खुली

महापालिकेनं मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील २३ उद्यानं २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेची २३ उद्यानं राहणार २४ तास खुली
SHARES

मुंबईकरांना आता २४ तास महापालिकेच्या उद्यानांमध्ये फिरता येणार आहे. कारण, महापालिकेनं मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील २३ उद्यानं २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी शनिवारी हा निर्णय जाहीर केला असून, सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

७५० उद्यानं

मुंबई महापालिकेची शहर आणि उपनगरांत मिळून सुमारे ७५० उद्यानं आहेत. या उद्यानांचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो तसेच, आरोग्याच्या दृष्टीनंही ही उद्यानं महत्त्वाची आहेत. त्यामुळे नागरिकांनी केलेल्या विनंतीचा सकारात्मक विचार करत विविध भागांतील २३ उद्याने २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुरक्षा व्यवस्था

उद्यानं २४ तास खुली राहाणार असल्यानं त्यामधील सुरक्षा व्यवस्थेत आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले असून, या उद्यानांचं रक्षण आणि देखभाल ही उद्यानं खुली असतानाच करावीत, असेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत. उद्यानं २४ तास खुली ठेवण्यासाठी उद्यांनाच्या प्रवेशद्वारांवर सुधारित वेळांचं फलक तातडीनं लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, मुंबईत दिवसाढवळ्या सुरू असलेली गुन्हेगारी व इतर प्रकार पाहता उद्यानं २४ तास खुली ठेवणं योग्य आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

ही उद्यानं राहणार खुली

मुंबई

 • कुलाबा ए विभाग : कुपरेज बॅण्डस्टॅण्ड उद्यान.
 • काळबादेवी सी विभाग : भगवानदास तोडी उद्यान.
 • गिरगाव डी विभाग : टाटा उद्यान.
 • भायखळा ई विभाग : अब्दुला बरेलिया उद्यान.
 • माटुंगा एफ उत्तर विभाग : महेश्वरी उद्यान.
 • वरळी एफ दक्षिण विभाग : बिंदूमाधव ठाकरे उद्यान.
 • परळ जी दक्षिण विभाग : आद्य शंकराचार्य उद्यान.
 • दादर जी उत्तर विभाग : आजी-आजोबा उद्यान.

पूर्व उपनगर

 • कुर्ला एल विभाग : छत्रपती शिवाजी महाराज उद्यान.
 • चेंबूर एम पूर्व विभाग : बिंदूमाधव ठाकरे मनोरंजन मैदान.
 • मानखुर्द एम पश्चिम विभाग : डी. के. संधू उद्यान.
 • घाटकोपर एन विभाग : डॉ. केशव बळीराम हेडगेवार उद्यान.
 • भांडुप एस विभाग : शहीद जयवंत हनुमंत पाटील मनोरंजन उद्यान.
 • मुलुंड टी विभाग : लाला तुळशीराम उद्यान.

पश्चिम उपनगर

 • वांद्रे एच पूर्व विभाग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान.
 • वांद्रे एच पश्चिम विभाग : रावसाहेब पटवर्धन उद्यान.
 • अंधेरी के पूर्व विभाग : श्रीसाईलीला मनोरंजन मैदान.
 • अंधेरी के पश्चिम विभाग : कमलाकरपंत वालावलकर मनोरंजन मैदान.
 • गोरेगाव पी दक्षिण विभाग : वेदप्रकाश चड्ढा उद्यान.
 • मालाड पी उत्तर विभाग : स्वतंत्रता उद्यान.
 • बोरिवली आर दक्षिण विभाग : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यान.
 • कांदिवली आर मध्य विभाग : गांजावाला उद्यान.
 • दहिसर : आर उत्तर विभाग जरी मरी उद्यान.हेही वाचा -

डोंबिवलीत पडला तेलमिश्रित पाऊस, रहिवाशी हैराण

मुंबई- पुणे महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर, योग्य वेळेत होणार उपचारRead this story in हिंदी
संबंधित विषय