Advertisement

मुंबई- पुणे महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर, योग्य वेळेत होणार उपचार

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातातील जखमींवर उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात आलं आहे.

मुंबई- पुणे महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर, योग्य वेळेत होणार उपचार
SHARES

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादा ओलांडल्यानं किंवा अन्य कारणांमुळं अपघात झाल्याच्या घटना सतत घडत असतात. या अपघातांमध्ये अनेक प्रवाशांना आपला जीव गमवाव लागतो. तसंच अनेक जण गंभीर जखमी होतात. त्यामुळं रस्ते अपघातातील जखमींवर पहिल्या तासात योग्य उपचार मिळाल्यास त्यांचा जीव वाचू शकतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील तळेगाव टोलनाक्याच्या बाजूला ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.

ट्रॉमा केअर सेंटर 

आरोग्य विभाग, एमएसआरडीसी, एसजी डायग्नोस्टिक आणि पवना हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरसाठी हॉटलाइन क्रमांकही देण्यात येणार आहे. तसंच, छोटे शस्त्रक्रिया गृह, तज्ज्ञ डॉक्टर, कार्डिअक रुग्णवाहिका आदी व्यवस्था करण्यात आली आहे. या ट्रॉमा केअर सेंटरचं उद्घाटन रविवारी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.

३० हजार अपघात

राज्यात वर्षांकाठी सुमारे ३० हजार अपघात होत असून यामध्ये २०१८ मध्ये १३,५६० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळं प्रवाशांना अशा अपघातावेळी तातडीनं उपचार मिळण्यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे.  हेही वाचा -

डोंबिवलीत पडला तेलमिश्रित पाऊस, रहिवाशी हैराण

मिठी नदीचा पूर रोखणार, महापालिका बांधणार कृत्रिम तलावसंबंधित विषय