Advertisement

मिठी नदीचा पूर रोखणार, महापालिका बांधणार कृत्रिम तलाव

मिठी नदीला येणारा पूर रोखण्यासाठी कृत्रिम तलाव बांधण्याची महापालिकेची योजना आहे.

मिठी नदीचा पूर रोखणार, महापालिका बांधणार कृत्रिम तलाव
SHARES

दरवर्षी मुंबईत जस्तीचा पाऊस पडल्यावर मिठी नदीला पूर येतो. मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यास नजीकच्या परिसरातील रहिवाशांसह अनेकांना त्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळं या मिठी नदीला येणारा पूर रोखण्यासाठी कृत्रिम तलाव बांधण्याची महापालिकेची योजना आहे. त्यानुसार, संजय गांधी नॅशनल पार्क किंवा आरे कॉलनी इथं कृत्रिम तलाव बंधण्यात येणार आहे.

पाण्याच्या पातळीत वाढ

मिठी नदीमध्ये पवई, तुलसी आणि विहार तलावातून पाणी येत. ज्यावेळी या तलावांमधील पाण्याची पातळी वाढते त्यावेळी पाणी मिठी नदीमध्ये सोडण्यात येते. या पाण्याचं प्रमाण जास्त असल्यानं सर्व पाणी मिठी नदीमध्ये राहणं शक्य नाही. त्यामुळं पूर येतो. मात्र, हे पाणी वाचविल्यास पूर येणार नाही. त्यामुळं कृत्रिम तलाव बांधण्याची महापालिकेची योजना आहे.

४०० मिमी पाऊस

मुंबईत १ ते ४ सप्टेंबरपर्यंत ४०० मिमी पाऊस पडला. हा पाऊस सप्टेंबर महिन्यातील सरासरी पावसापेक्षा जास्त होता. ४ सप्टेंबर रोजी सकाळच्यावेळी मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळं, कुर्ला, सायन, माटुंगा आणि बिकेसी परिसरात पूर आला. त्यावेळी सुरक्षेच्या दृष्टीनं नदी नजीकच्या तब्बल १५०० रहिवासांना हलविण्यात आलं.हेही वाचा -

राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून धावणार ४ वेळा

नामांकित कॉलेजांत अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश, राज्य मंडळातील विद्यार्थ्यांना दिलासाRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा