Advertisement

राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून धावणार ४ वेळा

मध्य रेल्वे मार्गावरील राजधानी एक्सप्रेस आता आठवड्यातून ४ वेळा धावणार आहे.

राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून धावणार ४ वेळा
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरील राजधानी एक्सप्रेस आता आठवड्यातून ४ वेळा धावणार आहे. याआधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दिल्ली या मार्गावर राजधानी एक्सप्रेस आठवड्यातून दोनदा धावत होती. मात्र, येत्या १५ दिवसांनंतर ही ४ वेळा धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दिल्ली या मार्गावर राजधानी एक्सप्रेस ४ वेळा धावण्यासाठी आणखी एका गाडीची आवश्यकता आहे. त्यामुळं ही गाडी आल्यावर त्याची तपासणी करून १५ दिवसांनंतर ही राजधानी एक्सप्रेस ४ वेळा चालविण्यात येणार आहे.

राजधानी एक्सप्रेसच्या फेऱ्या

दुसऱ्या राजधानीला आगामी एक-दोन दिवसांत अजून एक रेक मिळणार असून राजधानी एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढवणं शक्य होणार आहे. दुसरी गाडी येताच तिलाही पुश-पुल इंजिन लावण्यात येणार असून हे काम पूर्ण होण्यास एक आठवडा लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अनेक प्रवाशांना दिलासा

दरम्यान, मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला जानेवारी महिन्यात हिरवा कंदिल दाखविण्यात आला. त्यामुळं मुंबईबरोबरच नाशिक, जळगाव, भोपाळ येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.हेही वाचा -

नामांकित कॉलेजांत अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश, राज्य मंडळातील विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबईसह उपनगरात गुरुवारपर्यंत संततधार, हवामान विभागाचा अंदाजRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement