यंदा सीबीएसई, आयसीएसई विद्यार्थ्यांच्या तुलनेत राज्य मंडळाचा निकाल कमी लागला. त्यामुळं राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजांतील प्रवेशांना मुकावे लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळं यावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं नामांकित कॉलेजांमध्ये अतिरिक्त जागांना मंजुरी दिली होती. अल्पसंख्याक कोटा लवकरात लवकर सर्वांसाठी खुल्या करण्याचं आवाहनही केलं होतं. त्यामुळं राज्य मंडळातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
नामांकित कॉलेजांमध्ये विशेष फेरीपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश संधी खुली झाली होती. दुसऱ्या किंवा फार तर तिसऱ्या फेरीनंतर मुंबईतील नामांकित कॉलेजांतील जागा संपतात. त्यामुळं अनेक विद्यार्थी या कॉलेजांतील प्रवेशापासून वंचित राहत होते किंवा त्यांना संधी मिळत नव्हती. मात्र, यंदा अधिकाधिक विद्यार्थ्यांना या कॉलेजांत संधी मिळाली असून विशेष फेरीसाठी प्रथमच या कॉलेजांमध्ये सरसरी १०० जागा शिल्लक होत्या.
यंदा विशेष फेरीनंतर आणि तिसऱ्या फेरीनंतर या कॉलेजांतील कट ऑफ घसरल्याचं पाहायला मिळालं. यावरून या कॉलेजांत अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश संधी मिळाल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा -
माऊंट मेरीच्या जत्रेसाठी बेस्टच्या जादा बसगाड्या
बेस्टची इलेक्ट्रिक बस धावणा मुंबईच्या रस्त्यावर