Advertisement

माऊंट मेरीच्या जत्रेसाठी बेस्टच्या जादा बसगाड्या

४०० जादा बसगाड्या सोडण्यात येणार असून वांद्रे पश्चिम ते माऊंट मेरी चर्च आणि इतर भागातून माऊंट मेरी चर्चपर्यंत धावणार आहेत.

माऊंट मेरीच्या जत्रेसाठी बेस्टच्या जादा बसगाड्या
SHARES

मुंबईतल्या वांद्रे इथं माऊंट मेरीची जत्रा सुरू झाली आहे. माऊंट मेरीच्या जत्रेवेळी ख्रिश्चन बांधवांची मोठ्याप्रमाणात गर्दी जमते. त्यामुळं या परिसरात होणारी ही गर्दी लक्षात घेत बेस्ट उपक्रमानं या जत्रेसाठी जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला. एकूण ४०० जादा बसगाड्या सोडण्यात येणार असून वांद्रे पश्चिम ते माऊंट मेरी चर्च आणि इतर भागातून माऊंट मेरी चर्चपर्यंत धावणार आहेत.

ख्रिश्चन बांधव

माउंट मेरीची जत्रा १५ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. दरवर्षी माऊंट मेरीच्या जत्रेला ख्रिश्चन बांधवांसोबत इतर धर्माचे बांधवही मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळं त्यांची ही गर्दी लक्षात घेत, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनाही तैनात करण्यात आलं आहे.

९४ अतिरिक्त बस

या जत्रेच्या शेवटच्या दिवशी १५ सप्टेंबर रोजी दिवसभरात ९४ अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत. वांद्रे स्थानक ते माऊंट मेरी चर्च हे साडेतीन किलोमीटर अंतर आहे. माऊंटमेरी जत्रेच्या कालावधीत प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टतर्फे सकाळी आणि संध्याकाळी जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहे.हेही वाचा -

बेस्टची इलेक्ट्रिक बस धावणा मुंबईच्या रस्त्यावर

‘आरे वाचवा, मुंबई वाचवा’, पर्यावरणप्रेमींच आंदोलनRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा