Advertisement

मुंबईसह उपनगरात गुरुवारपर्यंत संततधार, हवामान विभागाचा अंदाज

गुरुवारपर्यंत मुंबई आणि कोकण विभागात कायम असेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

मुंबईसह उपनगरात गुरुवारपर्यंत संततधार, हवामान विभागाचा अंदाज
SHARES

सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला पावसानं मुंबईसह उपनगरात दमदार हजेरी लावली. सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं सखल भागांत गुडघाभर पाणी साचलं होतं. त्यामुळं रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प होती. मात्र, रविवारी या पावसानं विश्रांती घेतली. कुलाबा इथं संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत केवळ ५.६ मिमी. पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ इथं २१.३ मिमी. पाऊसाची दिवसभरात नोंद झाली. परंतु, हा पाऊस गुरुवारपर्यंत मुंबई आणि कोकण विभागात कायम असेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

२४ तास पाऊस

हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानुसार कोकण विभागात गुरुवारपर्यंत पाऊस असणार आहे. तर मध्य महाराष्ट्रात आणखी २४ तास पावसाची शक्यता आहे. कोकण विभागात, मध्य महाराष्ट्रात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाच्या सरींचा अंदाज आहे. तसंच, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथं तयारीत राहण्याचा इशारा आहे. त्याशिवाय, मुंबई, कोल्हापूर, सातारा येथे परिस्थितीवर लक्ष ठेवा, असं नमूद करण्यात आलं आहे.

पावसाचा जोर कायम

मुंबईत शनिवारी संध्यकाळपासून पहाटेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. शनिवारी सकाळी ८.३० ते रविवारी सकाळी ८.३० या वेळेत सांताक्रूझ इथं ११९ मिमी. पावसाची  नोंद झाली आहे. तसंच, कुलाबा इथं ६६.४ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रूझ इथं १ जूनपासून एकूण पाऊस ३,२६५ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. तर कुलाबा इथं २ हजार ३२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रूझ येथील पाऊस आतापर्यंतच्या सरासरीपेक्षा तब्बल १,२७४ मिलीमीटरहून अधिक पडला आहे. कुलाब्याचा पाऊसही आत्तापर्यंतच्या सरासरीच्या ५१८ मिलीमीटरनं अधिक आहे. दरम्यान, या आठवड्यात पावसानं कुलाब्याची वार्षिक सरासरीही ओलांडली असून, कुलाब्यात वार्षिक सरासरी पाऊस २,१६० मिमी. पाऊस पडतो. आतापर्यंत २,३२५ मिमी. पाऊस कुलाब्यामध्ये नोंदवण्यात आला आहे.



हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९ : १२७ वर्षांपासून 'इथं' साधेपणानं साजरा होतो गणेशोत्सव



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा