डोंबिवलीत पडला तेलाचा पाऊस? रहिवासी हैराण

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं मुंबईकर हैराण झालेले असतानाच डोंबिवली एमआयडीसी परिसरात तेलमिश्रित पाऊस पडल्यानं स्थानिक आश्चर्य चकित झाले.

SHARE

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं मुंबईकर हैराण झालेले असतानाच डोंबिवली एमआयडीसी परिसरात तेलमिश्रित पाऊस पडल्यानं स्थानिक आश्चर्य चकित झाले. रविवारी पडलेल्या पावसाच्या पाण्यावर तेलाचे तवंग दिसत असल्यानं रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. 

प्रदूषणाची समस्या

एमआयडीसी परिसरात अनेक रासायनिक कंपन्या आहेत. त्यामुळं शहरात प्रदूषणाची समस्या कायम आहे. याच प्रदूषणामुळं तेलमिश्रित पाऊस पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडं तक्रार करण्यात आली आहे. तसंच, येथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर कंपन्यांमधून सोडला जाणारा वायू पाण्याच्या संपर्कात आल्यानं पावसाच्या पाण्यावर तेलाचा तवंग तयार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. 

रासायनिक कंपन्या

डोंबिवली एमआयडीसीत अनेक रासायनिक कंपन्या असून, यामुळं डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. याआधी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला होता. तर मागच्याच वर्षी एमआयडीसीच्या दावडी गावात गणेशमूर्ती काळवंडल्याचा प्रकार घडला होता.



हेही वाचा -

गणेश नाईकांचा भाजपप्रवेश ठरला, महापालिकेतील सत्ताही करणार हवाली

राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून धावणार ४ वेळा



संबंधित विषय
ताज्या बातम्या