Advertisement

गणेश नाईकांचा भाजपप्रवेश ठरला, महापालिकेतील सत्ताही करणार हवाली

नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर नक्की झाला आहे. नाईक बुधवारी ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात भाजपात प्रवेश करतील.

गणेश नाईकांचा भाजपप्रवेश ठरला, महापालिकेतील सत्ताही करणार हवाली
SHARES

नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर नक्की झाला आहे. नाईक बुधवारी ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात भाजपात प्रवेश करतील. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित असतील.  

महापालिकेत सत्ता

नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्यासोबत नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीचे ५५ नगरसेवक देखील भाजपात जातील. त्याआधी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक एकत्रित येऊन कोकण विभागीय आयुक्तांना पक्ष बदलासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करतील. यामुळे महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपाची सत्ता प्रस्थापित होणार आहे. 

हेही वाचा-गणेश नाईकांनी पक्ष खड्ड्यात घातला, जितेंद्र आव्हाडांनी डागली तोफ

२ मतदारसंघाची मागणी

गणेश नाईक यांचे चिरंजीव आमदार संदीप नाईक आणि पुतणे सागर नाईक यांनी आधीच भाजपात प्रवेश केला आहे. गणेश नाईक यांना मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश घ्यायचा होता. पण तारीख जुळून येत नसल्याने त्यांच्या पक्ष प्रवेशाला विलंब झाल्याचं म्हटलं जात आहे. तसंच नाईक यांनी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी बेलापूर आणि ऐरोली हे २ मतदारसंघ मागितल्याने शिवसेनेची आखपाखड सुरू झाली आहे.   

नाईक यांची कारकिर्द

नाईक यांनी २००४ ते २०१४ दरम्यान बेलापूर विधानसभा मतदासंघातून विधानसभेत प्रतिनिधीत्व केलं आहे. ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये पर्यावरण मंत्री होते. नाईक यांनी शिवसेनेतून १९९० मध्ये आमदार म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. १९९९ मध्ये ते शिवसेना सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले होते.   हेही वाचा-

भाजपाची मेगाभरती! शिवेंद्रराजे, कोळंबकर, नाईक, वाघ, पिचड यांचा पक्षप्रवेश

‘त्यांचं’ ठरलं ! राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक जाणार भाजपातRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement