Advertisement

भाजपाची मेगाभरती! शिवेंद्रराजे, कोळंबकर, नाईक, वाघ, पिचड यांचा पक्षप्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला.

भाजपाची मेगाभरती! शिवेंद्रराजे, कोळंबकर, नाईक, वाघ, पिचड यांचा पक्षप्रवेश
SHARES

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan sabha election) तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm devendra fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Bacchu Patil) यांच्या उपस्थितीत बुधवारी शिवेंद्रराजे भोसले (shivendra raje bhosale), मधुकर पिचड (madhukar pichad), वैभव पिचड (vaibhav  pichad), चित्रा वाघ (chitra wagh), कालिदास कोळंबकर (kalidas kolambkar) आणि संदीप नाईक (Sandeep naik), सागर नाईक (Sagar naik) यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांनीही भाजपात (BJP) उडी मारली. मुंबईतील गरवारे क्लब (garware club) येथील कार्यक्रमात या नेत्यांच्या पाठिराख्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गर्दीकडे पाहता भाजपाची जणू मेगाभरती सुरू असल्याचा भास होत होता.  

स्वेच्छेने पक्षात

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, "राष्ट्रवादीच्या नेत्यांना सीबीआय, ईडी तसंच प्राप्तिकर विभागाची भीती दाखवून भाजपात येण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला होता. परंतु त्यांच्या दाव्यात कुठलंही तथ्य नाही. कारण हे सर्व नेते स्वत:च्या इच्छेने भाजपात आले आहे. त्यांच्यावर कुठलीही जोर जबरदस्ती करण्यात आलेली नाही. तुम्ही शिवसेनेतून गणेश नाईक (Ganesh naik) तसंच छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांना फोडलं तेव्हा त्यांना अशीच धमकी दिली होती का?" असाही प्रतिप्रश्नही पाटील यांनी पवार यांना विचारला.

भाजप कुटुंबात स्वागत

महाराष्ट्रातल्या आपल्या राजकीय कारकिर्दीनेवेगळी ओळख निर्माण केलेले अनेक दिग्गज नेते भाजपाच्या परिवारात आले याचा खूप आनंद होत आहे. या सर्वांचं भाजपात स्वागत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.  

आम्हाला महाराष्ट्रात विकासाचं राजकारण करायचं आहे. म्हणूनच माझ्यासहीत इतर नेत्यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री यापुढंही चांगलं काम करतील. अपेक्षा आहे की भाजपात आम्हाला बरोबरीची वागणूक मिळेल, असा विश्वास मधुकर पिचड यांनी व्यक्त केला.



हेही वाचा-

गणेश नाईकांनी पक्ष खड्ड्यात घातला, जितेंद्र आव्हाडांनी डागली तोफ

मला नाही पक्षबदलूंची चिंता, शरद पवार असं का म्हणाले?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा