Advertisement

दिवाळीआधी मिठाई दुकानांमध्ये भेसळ तपासणी

एफडीए अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध भागातून एकूण 2,369 अन्ननमुने गोळा केले आहेत.

दिवाळीआधी मिठाई दुकानांमध्ये भेसळ तपासणी
(Representational Image)
SHARES

दिवाळीचा (Diwali 2025) सण जवळ येत असताना अन्नातील भेसळ रोखण्यासाठी महाराष्ट्र (maharashtra) अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष मोहीम सुरू केली आहे.

शनिवारी 4 ऑक्टोबरपर्यंत एफडीए अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध भागातून एकूण 2,369 अन्ननमुने गोळा केले आहेत. तसेच 1,594 मिठाई दुकाने (sweet shops) तपासण्यात आली आहेत.

मिळालेल्या 554 नमुन्यांच्या चाचणी अहवालांपैकी 513 नमुने सुरक्षित, 11 नमुने असुरक्षित, 26 नमुने असमाधानकारक, तर 4 नमुन्यांमध्ये लेबलिंगसंबंधी त्रुटी आढळल्या आहेत.

उर्वरित 1,815 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्राप्त व्हायचे आहेत. या मोहिमेत दूध, खवा, तूप, खाद्यतेले, मिठाई, सुका मेवा आणि चॉकलेट्स यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे.

तसेच दूध भेसळ तपासणी मोहीम लवकरच सुरू होणार आहे. यासाठी 200 हून अधिक सहाय्य आयुक्त (अन्न) आणि अन्न सुरक्षा अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

ही पदे 2022 पासून रिक्त होती. प्रयोगशाळांची पायाभूत सुविधा सुधारण्यात आली आहेत. तसेच अन्न तपासणी (food adulteration)प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी नवी प्रयोगशाळा नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे सुरू करण्यात येणार आहेत.

एफडीएने वित्त विभागाकडे 750 नव्या पदांची मागणी केली आहे. त्यासोबत 250 प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांची नवीन पदे प्रस्तावित केली आहेत.

उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी या सुधारणा योजनेसाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

तसेच, जीएसटी सवलतींचा लाभ ग्राहकांना न देणाऱ्या अन्न व औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.



हेही वाचा

मुंबईत ट्रॅफिक सिग्नल्सवर बीपर्स बसवणार

नवी मुंबई विमानतळापर्यंत सुरू होणार बस सेवा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा