Advertisement

एमआयएमची पहिली यादी जाहीर, 'हे' आहेत मुंबईतील ५ उमेदवार

एमआयएमने मुंबईतील आपल्या ५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ही यादी ट्विट केली आहे.

एमआयएमची पहिली यादी जाहीर, 'हे' आहेत मुंबईतील ५ उमेदवार
SHARES

राज्यातील विधानसभा निवडणुका एमआयएम पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. एमआयएमने मुंबईतील आपल्या ५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ही यादी ट्विट केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीशी युती होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 

 एमआयएमने वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होत लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, जागा वाटपातील वादामुळे विधानसभा निवडणुकीत ही युती झाली नाही. एमआयएमशी अखेरच्या क्षणापर्यंत चर्चा सुरू राहील, असं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे एमआयएम वंचितबरोबर निवडणुका लढवेल अशी आशा होती. मात्र, एमआयएमने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  एमआयएमने मुंबईतील कुर्ला, वांद्रे पूर्व, भायखळा, अणुशक्तीनगर व अंधेरी पश्चिम या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. 


एमआयएमची पहिली यादी

  • वारीस पठाण (भायखळा) 
  • सलीम कुरेशी (वांद्रे पूर्व) 
  • आरिफ शेख (अंधेरी पश्चिम) 
    रत्नाकर डावरे (कुर्ला)
  • सरफराज शेख (अणुशक्तीनगर)



हेही वाचा -

युतीची चिंता मलाही- मुख्यमंत्री

कोण आहे हा मुलगा? ज्याला मिळाला मोदी-ट्रम्पसोबत सेल्फी…




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा