Advertisement

कोण आहे हा मुलगा? ज्याला मिळाला मोदी-ट्रम्पसोबत सेल्फी…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, तर विचारायलाच नको. अशा टाॅप मोस्ट व्यक्तीसोबत सेल्फी काढायची हिंमत तरी कोण करेल? पण एक मुलगा त्याला अपवाद ठरलाय.

कोण आहे हा मुलगा? ज्याला मिळाला मोदी-ट्रम्पसोबत सेल्फी…
SHARES

देशातील सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था कुणासाठी असते? असा प्रश्न विचारला, तर पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष असं उत्तर सहजपणे कुणालाही देता येईल. त्यातच ते जर जगातील आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, तर विचारायलाच नको. अशा टाॅप मोस्ट व्यक्तीसोबत सेल्फी काढायची हिंमत तरी कोण करेल? पण एक मुलगा त्याला अपवाद ठरलाय.  

रातोरात स्टार

ह्युस्टन इथं झालेल्या ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमात एका ९ वर्षांच्या मुलाने मोठं धाडस अत्यंत सहजरित्या करून चक्क डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत सेल्फी काढलाय. हा सेल्फी सोशल मीडियावर इतका हिट ठरलाय की हा मुलगा एका रात्रीत सोशल मीडियावरील स्टार बनलाय. पण अजूनही एक प्रश्न अनुत्तरीच आहे, तो म्हणजे कोण आहे हा मुलगा?

मुलाला शोधलं

मोदी-ट्रम्प यांच्यासोबत सेल्फी काढणाऱ्या या मुलाचं नाव सात्विक हेगडे असं असून तो ९ वर्षांचा आहे. 'विजयकर्नाटकडॉटकॉम' या वेबसाइटने या मुलाला शोधून काढलंय. त्याच्या वडिलांचं नाव प्रभाकर आणि आईचं नाव मेधा हेगडे असं आहे. हे कुटुंब कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात राहणारं आहे.


‘असा’ मिळाला सेफ्ली

स्टनच्या एनआरजी स्टेडियममध्ये आयोजित हाउडी मोदी कार्यक्रमात योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम संपल्यानंतर काही भारतीय मुलं दोन्ही नेत्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक वेशभूषेत उभे होते. त्यात सात्विक देखील होता. ट्रम्प मोदी यांच्यासोबत मुलांना भेटून व्यासपीठाकडे जात असताना ट्रम्प यांनी सात्विकच्या हातात मोबाइल पाहिला आणि थांबले. त्यांनी सात्विकला काही प्रश्न विचारले. सात्विकने तुमच्यासोबत सेल्फी काढायचा आहे, असं सांगितल्यावर  दोन्ही नेत्यांनीही सेल्फीसाठी तयारी दाखवली. सेल्फी काढल्यानंतर मोदींनी मुलाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली, तर ट्रम्प यांनी हस्तांदोलन केलं.



हेही वाचा-

आधी मुंबईतील खड्डे भरा; मग महाराष्ट्र घडवा! मुंबईकरांकडून आदित्य ठाकरे ट्रोल

काश्मीरमधील पर्यटन स्थळं अदानी, अंबानीच्या घशात?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा