Advertisement

काश्मीरमधील पर्यटन स्थळं अदानी, अंबानीच्या घशात?

काश्मीरमधील ३७० कलम रद्द करून तिथली पर्यटनस्थळं अदानी आणि अंबानी यांना विकण्याचा केंद्र सरकारचा डाव, असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला.

काश्मीरमधील पर्यटन स्थळं अदानी, अंबानीच्या घशात?
SHARES

काश्मीरमधील ३७० कलम रद्द करून तिथली पर्यटनस्थळं अदानी आणि अंबानी यांना विकण्याचा केंद्र सरकारचा डाव, असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘आरएसएस’च्या मुख्यालयावर झेंडा

कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच भारताचा झेंडा फडकल्याची चुकीची माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देत आहेत. परंतु काश्मीरमध्ये आधीपासूनच भारताचा झेंडा फडकत आहे. उलट नागपूरमधील आरएसएसच्या मुख्यालयावर भारताचा झेंडा फडकत नव्हता, तो आमच्या आंदोलनामुळं फडकत असल्याचंही नवाब मलिक म्हणाले. काश्मीरच्या झेंड्याला विरोध करणारं सरकार नागालँडमधील वेगळ्या झेंड्याला विरोध का करत नाही, असा प्रश्नही मलिक यांनी उपस्थित केला.

काश्मीरवरून राजकारण 

काश्मीरच्या मुद्द्यावरून भाजप सरकार केवळ राजकारण करत आहे. ३७० कलम रद्द करून काश्मीरमधील पर्यटनस्थळं अदानी आणि अंबानी यांच्या घशात घालण्याचा केंद्र सरकारचा डाव, असल्याचा आरोपही मलिक यांनी केला.

तसंच केंद्र व राज्य सरकारने अजूनपर्यंत एकही प्रकल्प पूर्ण केला नसून मुंबईतील मेट्रो प्रकल्पही आघाडी सरकारच्या काळातील असल्याचा टोला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. 



हेही वाचा-

शस्त्रसंधी झाली नसती, तर पीओके जन्मालाच आला नसता- अमित शहा

पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच, अमित शहांच्या वक्तव्यामुळं शिवसेना दबावात..?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा