मिलिंद देवराही भाजपच्या वाटेवर? केलं मोदींचं कौतुक

काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ह्युस्टन इथं केलेल्या भाषणाचं कौतुक केलं आहे.

SHARE

काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ह्युस्टन इथं केलेल्या भाषणाचं कौतुक केलं आहे. या कौतुकाची पंतप्रधान मोदींनींही दखल घेत देवरांचे आभार मानले आहेत. यामुळे देवराही आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.   

‘हाउडी मोदी’ कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण हे भारताची बौद्धीक आणि सांस्कृतिक ताकद दाखवणारं आहे. असं ट्विट देवरा यांनी केलं.

या ट्विटला उत्तर देत दिवंगत मुरली देवरा यांनीही भारत-अमेरिका या दोन्ही देशांतील संबंध घट्ट करण्यासाठी मोलाचा वाटा उचलला होता. सध्याचे दोन्ही देशांतील संबंध पाहून त्यांना नक्कीच आनंद झाला असता, असं म्हटलं.

तर पुन्हा देवरा यांनी मुरलीभाई नेहमीच राष्ट्राला सर्वस्व मानून काम करत होते. भारत-अमेरिकेतील संबंध दृढ होण्यासाठी ते प्रयत्नशील होते, असं म्हटलं. 


हेही वाचा-

भारत-पाकिस्तानची फाळणी सोपी, पण युतीचं जागावाटप भयंकर - संजय राऊत

कोण आहे हा मुलगा? ज्याला मिळाला मोदी-ट्रम्पसोबत सेल्फी…संबंधित विषय
ताज्या बातम्या