Advertisement

ईडीची शाखा भाजप कार्यालयात सुरू करा, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची भाजपवर टीका

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “ED, CBI, Income Tax ची कार्यालये भाजपाच्या कार्यालयातच सुरू करा, असा खोचक सल्ला सावंत यांनी दिला आहे.

ईडीची शाखा भाजप कार्यालयात सुरू करा, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची भाजपवर टीका
SHARES

शिखर बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला असून पवार शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात हजर होणार आहेत. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “ED, CBI, Income Tax ची कार्यालये भाजपाच्या कार्यालयातच सुरू करा, असा खोचक सल्ला सावंत यांनी दिला आहे.

भाजपकडून खुलासा

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाला लक्ष्य करण्यास सुरूवात केल्यावर ईडीच्या कारवाईचा आणि भाजपाचा कुठलाही संबंध नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

आश्चर्य व्यक्त

याआधीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासहीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ईडीने गुन्हे नोंदवल्यावर भाजपकडून या कारवाईशी कुठलाही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. पवार यांचं नाव आरोपींच्या यादीत नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच कसा यावर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. 

दरम्यान, काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही यावरून भाजपवर टीका केली आहे. सावंत म्हणाले, “सरकारने तातडीने नवीन जेल बनवायला सुरुवात करावी. पुढे विरोधकांकरीता जेलमध्ये जागा कमी पडायला नको. उगीचच सरकारला आयत्या वेळी डोकेदुखी, नाही का?. ED, CBI, Income Tax ची कार्यालये एवढी दूर का? भाजपाच्या कार्यालयातच यांच्या शाखा सुरू करा राज्यकर्त्यांची काळजी वाटते म्हणून हा सल्ला!,” असं सावंत म्हणाले.


हेही वाचा-

अण्णांनी घेतली शरद पवारांची बाजू, म्हटले खोटे आरोप करणं चुकीचं

शरद पवार लढवणार का साताऱ्याची पोटनिवडणूक? उदयनराजेंची कोंडी करण्याची खेळी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा