Advertisement

अण्णांनी घेतली शरद पवारांची बाजू, म्हटले खोटे आरोप करणं चुकीचं

खोटे आरोप करणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पवार यांची बाजू घेतली.

अण्णांनी घेतली शरद पवारांची बाजू, म्हटले खोटे आरोप करणं चुकीचं
SHARES

राज्य शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मी जे काही पुरावे दिले आहेत. त्या पुराव्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव नाही. हे सत्य असून खोटे आरोप करणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पवार यांची बाजू घेतली. 

चौकशी झाली पाहिजे

राज्य शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अण्णा हजारे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, या घोटाळ्यात शरद पवार यांचं नाव कसं आलं हे मला ठाऊक नाही. पण या प्रकरणाची चौकशी निश्चितपणे झाली पाहिजे. चौकशीनंतर दोषींवर कारवाई जरूर व्हावी. मात्र दोषी नसणाऱ्या व्यक्तींना विनाकारण अडकवण्यात येऊ नये, अशी  

नावचं नाही

मी दिलेल्या पुराव्यात शरद पवार यांचं नाव नाही. पण पुरावे देऊनही ज्या अधिकाऱ्यांनी आरोपींवर कारवाई केली नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. माझ्याकडं शरद पवार यांच्याविरूद्ध पुरावे नाही हे सत्य आहे. जे सत्य आहे ते सत्यच, खोटे आरोप करणे चुकीचे आहे. असं असूनही पवार यांचं नाव आता कसं पुढे आलं, याची चौकशी झाली पाहिजे, असंही हजारे म्हणाले.



हेही वाचा-

ईडीचा पाहुणचार स्वीकारणार- शरद पवार

शरद पवार, अजित पवारांवर ईडीकडून गुन्हा दाखल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा