Advertisement

ईडीचा पाहुणचार स्वीकारणार- शरद पवार

ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असून ईडीचा पाहुणचार स्वीकारण्याची तयारी असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं. मुंबईत बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ईडीचा पाहुणचार स्वीकारणार- शरद पवार
SHARES

शिखर बँक घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचलनालया (ED)नं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यावर बोलताना ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असून ईडीचा पाहुणचार स्वीकारण्याची तयारी असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं. मुंबईत बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.   

काय म्हणाले पवार?

ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केल्याचं मला काल संध्याकाळी कळलं. त्यांच्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य करणार आहे. पुढचे काही दिवस मी निवडणूक प्रचारासाठी मुंबईच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे. ईडीला मला काही प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल आणि त्यावेळेस मी अदृष्य झाल्याचं ईडीला वाटायला नको म्हणून मी २७ सप्टेंबरला दुपारी २ वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात स्वतःहून जाणार असल्याचं पवार म्हणाले. 

नक्की गुन्हा काय?

मी राज्य सहकारी बँकेचा कधीही संचालक वा सदस्य कधीच नव्हतो. नक्की गुन्हा काय आहे, हे मला देखील समजावून घ्यायचं आहे. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना मी पूर्ण सहकार्य करेन. त्यांना माझ्याकडून जी माहिती हवी आहे ती देईन. त्यांना जो काही पाहुणचार करायचा असेल तो स्वीकारण्याची माझी तयारी आहे, असंही ते म्हणाले.  

कुणासमोर झुकणार नाही

१९८० मध्ये अमरावतीत एका शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मला सर्वात पहिल्यांदा अटक झाली होती. परंतु निकाल माझ्या बाजूनं लागल्याने प्रश्नच उरला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर माझा पू्र्ण विश्वास असून दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राला शिकवलेला नाही, अशी टीकाही पवार यांनी कुणाचं नाव न घेता केली. 



हेही वाचा-

बारामती कायमची बंद ठेवा, काय फरक पडतोय- अंजली दमानिया

ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा