Advertisement

बारामती कायमची बंद ठेवा, काय फरक पडतोय- अंजली दमानिया

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बारामती कायमची बंद ठेवा, असा खोचक सल्ला राष्ट्रवादीला दिला आहे.

बारामती कायमची बंद ठेवा, काय फरक पडतोय- अंजली दमानिया
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यावर अंमलबजावणी संचलनालया (ED)कडून गुन्हा दाखल झाला आहे. या निषेधार्थ बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत बंदची हाक दिली आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बारामती कायमची बंद ठेवा, असा खोचक सल्ला  राष्ट्रवादीला दिला आहे. 

काय आहे प्रकरण?

राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने शरद पवार आणि अजित पवार यांच्यासहीत ७० जणांवर मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दिलीप देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांचाही समावेश आहे. कर्जांचं वितरण करताना २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा या सर्वांवर आरोप आहे. 

बारामती बंद

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्याचं म्हटलं जात आहे. परंतु शरद पवार यांचा या बँकेशी काहीही संबंध नसताना त्यांचं नाव घोटाळ्यात जाणीवपूर्वक गुंतवण्यात आल्याचं म्हणत त्यांच्या समर्थकांनी 'बारामती बंद'ची हाक दिली आहे. 

काय म्हणाल्या दमानिया?

या बंदवर दमानिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. 'हा सगळा किळसवाणा प्रकार आहे. चोर तो चोर, वर शिरजोर... बारामती कायमची बंद राहिली तरी कुणाला फिकीर आहे?, असं ट्विट त्यांनी केलं आहे. तसंच, 'तुम्ही बारामतीपुरतेच मर्यादित आहात हे दाखवून दिलंत,' असाही टोलाही दमानिया यांनी पवारांना लगावला आहे. 

परंतु ही कारवाई केवळ निवडणुकीपुरतीच आहे की त्यापुढची हे काळच सांगेल, असं म्हणत त्यांनी या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.



हेही वाचा-

शरद पवार, अजित पवारांवर ईडीकडून गुन्हा दाखल

पक्ष सोडून गेलेल्यांची चिंता नको, पुढचं सरकार आपलंच- शरद पवार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा