पक्ष सोडून गेलेल्यांची चिंता नको, पुढचं सरकार आपलंच- शरद पवार

पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांची काळजी करू नका, पुढचं सरकार आपलंच आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलासा दिला.

SHARE

पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांची काळजी करू नका, पुढचं सरकार आपलंच आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलासा दिला.  

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी मतदारसंघनिहाय बैठकांना सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये झालेल्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर निशाणा साधला.  

काय म्हणाले पवार?

निवडणूक आयोग चालू आठवड्यात निवडणूक जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयारीला लागलं पाहिजे. जे नेते पक्ष सोडून गेलेत त्यांची चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे. जनमत देखील सरकारविरोधातील आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये जोर लावल्यास पुढचं सरकार आपलंच आहे.    

येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ जागा लढणार असून मित्रपक्षांसाठी ३८ जागा सोडण्यात येणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, स्वाभिमानीचे राजू शेट्टी तसंच जोगेंद्र कवाडेंचा पक्ष व डावे पक्ष मिळून एकत्र निवडणूक लढवतील, असंही पवार म्हणाले.


हेही वाचा-

काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांवर ‘अशी’ केली मात

यंदाही आघाडीत मनसे नाही?संबंधित विषय
ताज्या बातम्या